ग्रीड फेल्युअरने मुंबईची बत्ती गुल! नाशिकच्या औष्णिक वीज केंद्राचे महत्व पुन्हा अधोरेखित

नीलेश छाजेड
Monday, 12 October 2020

आज (ता.१२) सकाळी मुंबईपुरीची बत्ती गुल झाली व नाशिक औष्णिक वीज केंद्राचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले. सकाळी 10 च्या सुमारास ग्रीड फेल झाले व संपूर्ण मुंबई विजेला मुकली.

एकलहरे (नाशिक) : ग्रीड फेल्युअरने आज (ता.१२) सकाळी मुंबईपुरीची बत्ती गुल झाली व नाशिक औष्णिक वीज केंद्राचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले. (ता. सकाळी 10 च्या सुमारास ग्रीड फेल झाले व संपूर्ण मुंबई विजेला मुकली.

ग्रीड फेल झाले व संपूर्ण मुंबई विजेला मुकली

ग्रीड स्टेबिलिटीसाठी नाशिकचे संच सुरू असणे गरजेचे आहे. पण कोरोना प्रादुर्भाव मुळे मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व उद्योग धंदे बंद असल्याने विजेच्या मागणीत मोठी घट आल्याने नाशिक सह इतर तीन वीज केंद्र बंद ठेवण्यात आले होते. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठत गेला व राज्याची विजेची मागणी ही वाढत गेली. परंतु इतर वीज केंद्र सुरू झाली पण अद्याप नाशिकला संच सुरू करण्याची परवानगी अजून मिळाली नाही.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

जर नाशिकचा एक संच जरी सुरू असता तर...

सोमवारी सकाळी एस एल डी सी कळवा वरून मुंबईला जाणारे 3 फिडर फेल झाले व त्याचा लोड पडघा लाईन वर आला व त्याचा परिणाम बाभलेश्वर लाईन वर होऊन ग्रीड फेल झाले. जर नाशिकचा एक संच जरी सुरू असता तर व्होल्टेज ड्रॉप झाले नसते व ही वेळ आली नसती. व मायानगरीवर हे संकट ओढवले नसते.अवघी वीजेची मागणी 15000 वर असतांना ग्रीड फेल झाले. व यामुळे स्टेबिलिटी साठी नाशिक सुरू राहणे गरजेचे आहे हे पुन्हा सिद्ध झाले.

हेही वाचा >  हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grid failure turns off Mumbai's lights due to nashik Power Station marathi news