खबरदारीसह चुकांच्‍या दुरुस्तीची हमी; पाच खासगी टेस्टिंग लॅबला परवानगी

Guaranteed to correct mistakes with caution Five private testing labs allowed in nashik
Guaranteed to correct mistakes with caution Five private testing labs allowed in nashik

नाशिक : कोरोना प्रादुर्भावाची साखळी खंडित करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कोरोनाबाधितांचा पत्ता रिपोर्टवर, तसेच महापालिकेने विकसित केलेल्या आयसीएमआर पोर्टलवर अपलोड करणे बंधकारक केले. तरीही पाच लॅबकडून पूर्तता होत नसल्याने तीन दिवसांपासून टेस्टिंगवर बंदी आणलेल्या लॅबधारकांकडून खबरदारीसह चुकांमध्ये दुरुस्ती करण्याच्या अटीवर पुन्हा परवानगी देण्यात आली आहे.

खबरदारी घेण्याची हमी

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून शोध घेण्याची मोहीम राबविली. या माध्यमातून कोरोनाला अटकाव करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे खासगी लॅबलाही एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्या रिपोर्टमध्ये पत्ता, संपर्क क्रमांक व आयसीएमआर पोर्टलवर लोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु दातार, क्रस्ना, इन्फेक्स, थायरोकेअर, एसआरएल या लॅबकडून कोरोनाबाधितांच्या रिपोर्टमध्ये फक्त ‘नाशिक’ असा उल्लेख केला जात असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय पथकाला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे अवघड होत होते. अनेकदा सूचना देऊनही दखल घेतली जात नसल्याने अखेर या पाचही लॅबवर टेस्टिंग करण्यास बंदी घालण्यात आली होती. आता नवीन रिपोर्ट तयार करताना खबरदारी घेण्याची हमी व जुन्या रिपोर्टमध्ये दुरस्ती करण्याचे लेखी दिल्यानंतर बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

संपादन : रमेश चौधरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com