"मास्क, सॅनिटायझरचा काळा बाजार केल्यास कारवाई" 

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 16 March 2020

अधिसूचनेनुसार केंद्राने 2 प्लाय आणि 3 प्लाय सर्जिकल मास्क, एन-95 मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर यांचा साठा होऊ नये, या वस्तू चढ्या भावाने विकू नयेत, ग्राहकांना त्या सहजासहजी उपलब्ध व्हाव्यात, काळा बाजार होऊ नये व जनतेला या वस्तू सहज उपलब्ध होतील, तसेच जनजागृती होईल याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कृत्रिम तुटवडा वा काळा बाजार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आदेश वैद्यमापन विभागाला दिले असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी म्हटले आहे.  

नाशिक : कोरोना विषाणूने जगभर धुमाकूळ घातलेला असताना, 2 प्लाय, 3 प्लाय सर्जिकल मास्क, एन-95 मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर यांचा जीवनाश्‍यक वस्तूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या वस्तूंचा कृत्रिम तुटवडा वा काळा बाजार केल्यास विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे अन्न व नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. 

पालकमंत्री भुजबळ : वैद्यमापन विभागाला कारवाईचे दिले आदेश 
कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने केंद्राने 13 मार्चच्या अधिसूचनेनुसार जीवनावश्‍यक वस्तू अधिनियम 1955 च्या परिशिष्टामध्ये कलम 2 ए अंतर्गत अनुक्रमांक 8 मध्ये मास्क 2, 3 प्लाय, सर्जिकल मास्क, एन-95 मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर या बाबींचा समावेश जीवनाश्‍यक वस्तू म्हणून केला आहे. येत्या 30 जूनपर्यंत ही अधिसूचना लागू आहे. याबाबत कार्यवाहीसाठी विभागांतर्गत संबंधित यंत्रणांना, तसेच गृह विभाग, सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र देण्यात आले आहे.

क्लिक करा > VIDEO : जावईबापू म्हणतात.."मी गाढवावरून मिरवणार..सगळ्यांचीच जिरवणार" "शंभर वर्षांची प्रथा आहे हो!"

त्यामुळे कायदेशीर कारवाईचे आदेश

अधिसूचनेनुसार केंद्राने 2 प्लाय आणि 3 प्लाय सर्जिकल मास्क, एन-95 मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर यांचा साठा होऊ नये, या वस्तू चढ्या भावाने विकू नयेत, ग्राहकांना त्या सहजासहजी उपलब्ध व्हाव्यात, काळा बाजार होऊ नये व जनतेला या वस्तू सहज उपलब्ध होतील, तसेच जनजागृती होईल याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कृत्रिम तुटवडा वा काळा बाजार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आदेश वैद्यमापन विभागाला दिले असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी म्हटले आहे.  

VIDEO : भयंकर प्रकार! निर्दयीपणे 'ते' तरुणाला भरचौकात मारत होते..अन् व्हिडीओ झाला व्हायरल.. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Chhagan Bhujbal ordered Action if scam in various masks, sanitizer nashik marathi news