शेतकऱ्याचे मार्गदर्शन अन् "तिला" मिळाली पीएचडी!

woman got phd.jpg
woman got phd.jpg

नाशिक : नाशिकच्या कांद्याचा प्रश्न नेहमीच गल्ली ते दिल्ली आणि विदेशात सुध्दा चर्चत असतो. असा हा कांदा सर्वाचा आवडता. परंतु जेव्हा कधीतरी भाव वाढतात तेव्हा मात्र असं सांगण्यात येतं.. कि कांदा महागला.. आमचे किचन बजेट कोलमडले. असा हा कांदा, एकाचवेळी कोणाला तरी हसवतो..कोणाला तरी रडवतो. प्रत्येक स्वयंपाक घरात वापरला जाणारा हा कांदा राजकारणात सुध्दा मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाने मिळाली पीएचडी 

महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. कांद्यावर उत्तर प्रदेशातील एका महिलेने पीएचडी करुन डॉक्टर पदवी मिळवली आहे. त्यासाठी नैताळेच्या कांदा उत्पादक संजय साठे या शेतकऱ्याने  मार्गदर्शन केले आहे.( बियाणे, लागवड, औषध, मशागत, खर्च, काढणी, साठवण, बाजारपेठ विक्री व्यवस्था व इतर माहिती )   उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यातील रामनगर तालुक्यातील उमरी भवानीपुर गावच्या कुमूद शुक्ल.अलाहाबाद विश्वविद्याल्यात २०१५ते२०१९ या कालावधीत अ‍ॅग्री बिझनेसमध्ये "कांदा" या विषयावर प्रबंध सादर केला, त्यासाठी शुक्ल त्यांच्या पतीसोबत नाशिकला आल्या. कांदा क्षेत्राना भेटी दिल्या. वेळोवेळी भ्रमणध्वनीव्दारे शेतकऱ्याशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यांच्यासोबत २५ जण होते. पीएचडीसाठी एकमेव शुक्लमँडमचाच विषय कांदा होता. त्यासाठी त्यानी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याची निवड केली होती. कांदा ह्याविषयावर पाच वर्ष अभ्यास करुन प्रबंध सादर करुन पीएचडीचे प्रमाणपत्र व डॉक्टर पदवी मिळवली. 

.....म्हणून मी कांदा विषय निवडला.

ज्यावेळी कांदा उत्पादक साठे यांनी शुक्ल यांना विचारले, "तुम्ही कांदा हा विषय का घेतला?" तेव्हा त्या म्हणाल्या.. कांदा हा प्रत्येकाला लागतो.. भाव कमी झाले की शेतकरी ओरडतो, भाव वाढले की ग्राहक ओरडतो. निवडणूक आली की राजकीय पक्ष त्याचा भांडवल करतात. माझे पती दुबई व इतरत्र कांद्याची निर्यात करतात, त्यामुळे मला जाणून घ्यायचं होत.सखोल अभ्यास करायाचा होता. म्हणून मी कांदा विषय निवडला. साठेंनी त्यांना विचारलं पुढे काय करणार आता. त्यांनी सांगितलं मी अ‍ॅग्री बिझनेस विषयावर पदवी घेतलेली आहे. उत्पादक व ग्राहक यांना किफायतशीर दरात दोघांनाही परवडेल अश्या भावात कसा कांदा देता येईल.. या विषयावर कुमुद शुक्ल या अभ्यास करणार आहे. विशेष म्हणजे शुक्ल या गृहिणी आहे. त्यांना दोन मुली आहे

या कल्पनेने मला आनंद

महाराष्ट्रासह देशभरात नेहमीच चर्चेत राहणारा कांदा आणि त्याच कांद्यावर पीएचडी मिळवणारी उत्तर प्रदेशातील महिला माझ्यासाठी प्रेरक असून रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुभवावर देखील अश्या प्रकारचा प्रबंध सादर होऊ शकतो. या कल्पनेने मला आनंद झाला आहे - संजय साठे नैताळे. ता. निफाड, नाशिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com