'या' देशांसह आखाती देशांतून कांद्याची मागणी वाढणार...कसं ते वाचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

जागतिक बाजारपेठेतील आयातदारांनी कांद्याची मागणी 60 टक्‍क्‍यांनी कमी केली आहे. त्याच वेळी बांगलादेशच्या सीमा रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने ट्रकने जाणारा कांदा थांबला. व्यापाऱ्यांनी त्यावर उपाय म्हणून रेल्वेद्वारे कांदा नेण्यास सुरवात केली. आतापर्यंत जवळपास 24 हजार टन कांद्याची निर्यात रेल्वेने बांगलादेशमध्ये झाली आहे.

नाशिक : उन्हाळ कांद्याचे भाव गडगडले असताना रमजान ईदनंतर कांद्याची मागणी वाढते हा अनुभव जमेस आहे. अशातच, रेल्वेने आणखी कांदा बांगलादेशला जाणार आहे, तसेच लॉकडाउनमधून काहीशी सवलत मिळू लागली आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात या देशांसह आखाती देशांतून कांद्याची मागणी वाढणार हे स्पष्ट झाले. त्यादृष्टीने निर्यातदारांनी तयारी सुरू केली आहे. 

भाव कोसळण्याची शक्‍यता मावळणार

कांद्याला भाव मिळत नाही म्हटल्यावर शेतकऱ्यांनी चाळींमध्ये कांदा साठवणुकीकडे कल वाढविला आहे. एवढेच नव्हे, तर यंदा मॉन्सूनचे आगमन वेळेत होत असल्याने शेतकरी खरिपाच्या तयारीला लागतील. स्वाभाविकपणे बाजारपेठेत विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याचे प्रमाण कमी होणार आहे. एकीकडे परदेशातून मागणी वाढत असताना दुसरीकडे कांद्याच्या उपलब्धतेवर मर्यादा येणार असल्याने एक ते दीड महिने भाव कोसळण्याची शक्‍यता मावळणार आहे. येत्या आठवडाभरात बांगलादेश, दुबईसह आखाती देशांतून कांद्याची मागणी वाढणार हे स्पष्ट झाले. कांदा उत्पादकांच्या दृष्टीने हे चांगले संकेत निर्यातदारांकडून मिळाले आहेत. 

24 हजार टन कांद्याची निर्यात 

जागतिक बाजारपेठेतील आयातदारांनी कांद्याची मागणी 60 टक्‍क्‍यांनी कमी केली आहे. त्याच वेळी बांगलादेशच्या सीमा रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने ट्रकने जाणारा कांदा थांबला. व्यापाऱ्यांनी त्यावर उपाय म्हणून रेल्वेद्वारे कांदा नेण्यास सुरवात केली. आतापर्यंत जवळपास 24 हजार टन कांद्याची निर्यात रेल्वेने बांगलादेशमध्ये झाली आहे. याखेरीज येत्या आठवड्यात आणखी रेल्वेने कांदा बांगलादेशमध्ये जाणार असल्याची माहिती निर्यातदारांपर्यंत पोचली आहे. दरम्यान, मलेशियाचा लॉकडाउन 9 जूनपर्यंत, तर सिंगापूरचा 2 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र ग्राहकांसाठी खरेदीची मुभा देण्यात आली आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! ''हे' रुग्णालय फक्त कोरोना रुग्णांसाठीच'...म्हणून रुग्णाला पाठविले माघारी...अन् अखेर

खरिपात कांद्याची लागवड 

दक्षिणेमध्ये विशेषतः कर्नाटकमध्ये जूनच्या अखेरीस कांद्याची लागवड होते. या कांदालागवडीची स्थिती स्पष्ट झाल्यावर साठविलेल्या उन्हाळ कांद्यासंबंधी आडाखे बांधणे शक्‍य होईल, असे निर्यातदार म्हणताहेत.  

हेही वाचा > विरोध डावलून 'इथं' त्यांची मनमानी सुरूच...इतका अट्टाहास का?...रंगतेय चर्चा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From the Gulf countries including Bangladesh-Dubai Demand for onions will increase during the week nashik marathi news

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: