तब्बल 12 लढाऊ विमाने होणार तयार.. एचएएलमध्ये समाधानकारक वातावरण

Su-30-MKI
Su-30-MKI

नाशिक : भारत व चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सुखोई एमकेआय जातीची लढाऊ विमाने तयार करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचे काम नाशिकच्या एचएएलला मिळाले आहे. तब्बल 12 लढाऊ विमाने तयार केली जाणार असून, वर्षभर पुरेल इतके काम आल्याने एचएएलमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

एचएएलला मिळाले लढाऊ सुखोईचे काम 

"कोविड-19'ने संपूर्ण जग व्यापल्याने देशादेशांमध्ये तणाव निर्माण होत आहे. चीनमधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचा आरोप झाल्यानंतर जगभरातील सर्वच देशांची चीनवर वक्रदृष्टी पडली. ड्रॅगननेही आक्रमकपणा दाखवत सीमांवरील देशांशी पंगा घेण्यास सुरवात केली. आशिया खंडात चीनचा सर्वांत मोठा स्पर्धक असलेल्या भारताच्या सीमेवर गेल्या महिन्यात गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमकी झाल्या. त्यात भारताचे काही सैनिक शहीद झाल्यानंतर भारतानेही चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी युद्धसज्जता करण्यास सुरवात केली आहे. गेल्या आठवड्यात संरक्षण मंत्रालयाने रशियासोबत करार करत 33 मिग- 29 विमाने आणि 12 सुखोई एमकेआय लढाऊ विमानांचे तंत्रज्ञान खरेदीचा करार केला. सुखोई एमकेआय लढाऊ विमाने नाशिकच्या एचएएलमध्ये तयार करण्याचा निर्णय संरक्षण मूल्यमापन समितीने घेतला आहे. 

वर्षभराची चिंता मिटली 
एचएएलने आतापर्यंत सुखोई-30 एमकेआय जातीची 221 विमाने तयार केली. एक लढाऊ विमान एअर फोर्सला मार्चमध्ये हस्तांतरित केले जाणार होते. मात्र, लॉकडाउनमुळे ते शक्‍य झाले नाही. लवकरच तयार लढाऊ विमान हस्तांतरित केले जाणार आहे. शेवटच्या विमानाची डिलिव्हरी झाल्यानंतर एचएएलकडे काम नसल्याने चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता नवीन 12 लढाऊ विमानांचे कंत्राट मिळाल्याने किमान वर्षभर कामाची चिंता मिटली आहे. एक लढाऊ विमान तयार करण्यासाठी सुमारे 900 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याने एचएएलच्या माध्यमातून दहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल यानिमित्त होणार आहे. 

सुखोई एमकेआय विमानांचे कंत्राट

एचएएलमध्ये साडेतीन हजार कामगार व दीड हजार अधिकारी आहेत. विमानाचे काम संपल्याने चिंता होती. मात्र, आता सुखोई एमकेआय विमानांचे कंत्राट मिळाले आहे. - सचिन ढोमसे, जनरल सेक्रेटरी, एचएएल कामगार संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com