positive story : कारभारणी लय भारी! दोन्ही पायाला अपंगत्व..तरीही दोन गावची सरपंच! 

kavita bhondwe sarpanch.jpg
kavita bhondwe sarpanch.jpg
Updated on

दिंडोरी (जि.नाशिक) : शारीरिक दृष्ट्या कमकुवत असूनही ह्या व्यक्तींनी आपल्या अपंगत्वाने खचून न जाता, जिद्दीने त्यावर मात करीत आपल्या आयुष्याची ध्येये साध्य केली आहेत. अशीच एक प्रेरणादायी बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातल्या महिला सरपंचाची...

विकासही करून दाखवते आणि बिनविरोध निवडून ही येते

दिंडोरी तालुक्यातील दहेगाव आणि वागळूद या दोन्ही गावांची मिळून दहेगाव ग्रुप ग्रामपंचायत. दोन्ही पायाने अपंगत्व असताना कविता भोंडवे आज यशस्वी सरपंच आहे. कविता भोंडवेने नुसता गावाचा कारभारच रुळावर आणला नाही, तर गावातील अवैध धंद्यांविरुद्धही ती उभी राहिली.. गावातील दारू दुकाने, मटक्याच्या अड्ड्यांविरोधात एल्गार पुकारला. महिलाना संघटित करून पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडले. कविताच्या या प्रयत्नांनंतर गावातील अवैध धंदे बंद झाले. दोन्ही पायाला अपंगत्व, तरीही टेलरिंगचा व्यवसाय करत करत ती दोन गावांचा सरपंच पदाचा कारभार समर्थपणे चालवते. विकासही करून दाखवते अन् पुन्हा बिनविरोध निवडून ही येतेय. 

सर्वानुमते सरपंचपद मिळाले आणि भ्रष्टाचार निपटून काढला
पोलिओमुळे अपंगत्व आलेली ३०-३२ वर्षांची कविता. सध्या ती दोन गावांचे सरपंचपद सांभाळते आहे. कविता  २४-२५ वर्षांची असताना गावाने निवडणुकीत तिला निवडून दिले आणि सर्वानुमते सरपंचपदीही निवडली गेली.  तिने ग्रामपंचायतींच्या कारभारात आमुलाग्र कायापालट घडवून आणला. सुरूवातीला कविताने ग्रामपंचायतीचा कारभार समजावून घेतला. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा नियमितपणे बोलावू लागली. भ्रष्टाचार समूळ निपटून काढला. दहेगाव आणि वागळूद या दोन्ही गावांतील महिलाचे  बचतगट स्थापन केले. त्यांना पहिल्या वर्षी १५ हजार, दुसर्‍या वर्षी एक लाखाचे कर्ज मिळवून दिले. तिच्या ग्रामसभेला सर्व महिला उपस्थित असतात आणि तिला नेहमी साथ देतात. सध्या कविताची सरपंचपदाची दुसरी टर्म आहे. दोन्ही गावांनी दुसर्‍यांदाही एकमताने तिलाच सरपंच केले आहे. 

कविता सलाम तुझ्या जिद्दीला!
कविताने सात वर्षांत दोन्ही गावांचा गाडा रुळावर आणला आहे. मुलींमध्ये शिक्षणाची जागृती करणे, स्वच्छता मोहीम याबाबतही ती कार्य करते. त्यासाठी तिने विवाहही केला नाही हे विशेष. सध्या आपला टेलरिंगचा व्यवसाय सांभाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com