भयानक! घराजवळ फटाके न फोडू दिल्याची डोक्यात पेटली आग; घटनेने परिसरात खळबळ

विनोद बेदरकर
Wednesday, 7 October 2020

घराजवळ फटाके का फोडताय? अशी विचारणा केल्याचा राग आल्याने एकास विटा व काठीने मारहाण केल्याची घटना  घडली. याप्रकरणी सोहेल कुतुबुद्दीन शेख (वय ३०, रा. यासिन शहा मदरसा जवळ, भारत नगर) याने मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाचा काय घडले?

नाशिक : घराजवळ फटाके का फोडताय? अशी विचारणा केल्याचा राग आल्याने एकास विटा व काठीने मारहाण केल्याची घटना  घडली. याप्रकरणी सोहेल कुतुबुद्दीन शेख (वय ३०, रा. यासिन शहा मदरसा जवळ, भारत नगर) याने मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाचा काय घडले?

अशी घडली घटना

फिर्यादीनुसार सुरैया, मुस्कान, हुजेब (पुर्ण नाव माहित नाही, रा. यासिन शहा मदरसा जवळ) व मोसिन इसमान बागवान अशी संशयितांची नावे असून त्यांना मंगळवारी (दि. ६) अटक करण्यात आली आहे. फिर्यादी सोहेलने दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी (ता. ५) रात्री अकरा वाजता संशयित घराजवळ फटाके फोडत होते. त्याचा धूर फिर्यादी सोहेलच्या घरात आल्याने घरातील लोकांना त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे सोहेलने फटाके का फाडले अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने संशयितांनी फिर्यादीस विटा, काठीने बेदम मारहाण केली. तसेच घरात घुसून फिर्यादीच्या बहिणीस देखील शिवीगाळ व मारहाण करत दम दिला. 

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

याप्रकरणी सोहेल कुतुबुद्दीन शेख (वय ३०, रा. यासिन शहा मदरसा जवळ, भारत नगर) याने मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हवालदार एस. पी. क्षिरसागर तपास करत आहेत. 

हेही वाचा > भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: he Asked why they was firing crackers near house, he angrily beat them nashik marathi news