थरारक.. "किस के किस के घर जाऊँ तसल्ली देने.." मालेगावच्या दफन संख्येबद्दल 'त्याने' सांगितली आपबिती..

प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 21 May 2020

तो म्हणाला.. "कोरोना से शहर में डर का माहोल है. डर कम करने के लिए ही मैने कोरोना संशयित मौतो को नहलाया। बंदे को कोई तकलीफ नहीं। मैं उंची आवाज में पुकारा करता हूँ, मुझे सालभर सर्दी रहती हैं। मैं सर्दी, खॉंसी की गोली सालभर जेब में लेके घुमता हूँ। मयतीचे पुकारे यासह जाहिरात, सभांचा प्रचार, धार्मिक ऐलान ही कामे करतो."

नाशिक / मालेगाव : "मालूम सबको है कि कोरोना से जिंदगी बेहाल है, लोग फिर भी पूछते हैं और सुनाओ क्‍या हाल है। क्‍या बताऊ आज शाम जो दोस्तो से चर्चा की कुछ मिनटों में उन्हे जीवन हॉस्पिटल ऍडमिट करने की खबरी मिली... मैं पहुँचने से पहिले ही उनका अंतकाल हुआ. जो दोस्तो के साथ गुजर जाने वाले लोगो के घर तसली के लिए जाता था, आज उन्होने ही मेरा साथ छोड दिया... आज उन दोस्तों के घर कैसे जाऊँ...' असे सांगत आपल्या अश्रूंना वाट करून दिली, ती मालेगाव शहरातील मुस्लिमबहुल भागात नित्याने निरोप देणाऱ्या अब्दुल रहीम याने. 

आज शाम बंदे से हुई बात..घंटे बाद उसका हुआ अंतकाल.. 

मालेगाव शहराच्या पूर्व भागात मयतीचे पुकारे व दफनविधीचे गेल्या 20 वर्षांपासून काम करणारे रहेमानी कफन सेंटरचे संचालक अब्दुल रहीम. वीस वर्षांच्या काळात आपण आठ हजारांहून अधिक जणांचा, तर कोरोना संसर्ग काळात सुमारे सहाशे जणांचा दफनविधी केला असल्याचे ते सांगतात. त्याच्या नोंदी आपल्याकडे असल्याचे सांगत अब्दुल रहीम म्हणाले, की सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत माझे काम सुरू असते. कोरोना से शहर में डर का माहोल है. डर कम करने के लिए ही मैने कोरोना संशयित मौतो को नहलाया। बंदे को कोई तकलीफ नहीं। मैं उंची आवाज में पुकारा करता हूँ, मुझे सालभर सर्दी रहती हैं। मैं सर्दी, खॉंसी की गोली सालभर जेब में लेके घुमता हूँ। मयतीचे पुकारे यासह जाहिरात, सभांचा प्रचार, धार्मिक ऐलान ही कामे करतो. आपले रहेमानी कफन सेंटर आहे. यापूर्वी मी बॉंबस्फोट, जळीत, कुजलेले मृतदेह, खून, शेकडो वार असलेल्यांना अंघोळ घातली. कधी अश्रू आले नाहीत. मात्र कोरोना संसर्ग काळात माझा जवळचा मित्र इस्माईल खान (केलेवाले) व जैनू पिंजारी यांच्या मृत्यूने मला रडविले. जैनूच्या गाडीवर मीच स्पीकर लावून दिला होता. मी पूर्वी किराणा दुकानात काम व हमाली केली. नंतर या कामाकडे वळलो. घरी आई, वडील, भाऊ, भावजय, पत्नी, मुलगी, चार मुले असा मोठा परिवार आहे. उन्हे मेरी फिक्र रहती है। मगर मुझे खिदमत में खुशी मिलती है, असे ते आवर्जून सांगतात. 

हेही वाचा > संशोधकांना सुखद धक्का! काळाराम मंदिरासमोर खोदकामात 'हे' काय आढळले?
अडीच हजारांत कफन से दफन तक अन्‌ मृत्यूचा दाखलाही 
मालेगाव शहरात कुठेही मृत्यू झाल्यानंतर आपल्याला फोन येतो. यानंतर कुटुंबीयांनी कसलीही चिंता करायची नसते. मयतीचा पुकारा, कब्रस्तानात माणसांना खड्डे खोदण्यास सांगणे, त्यांची मजुरी, कफन, बरगा, दफनविधी करणे इतकेच नव्हे, तर महापालिकेतून मृत्यूचा दाखला काढून देण्याचे सर्व काम मी करतो. यासाठी मला अडीच हजार रुपये मिळतात. सर्व खर्च जाऊन तीन-चारशे रुपये मिळतात. -अब्दुल रहीम, पुकारेवाले, रहेमानी कफन सेंटर 

हेही वाचा >  GOOD NEWS : येवला, दाभाडी, ओझरच्या भाळी कोरोनामुक्तीचा टिळा! 'हा' तालुकाही कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He told about the burial due to corona virus in Malegaon.nashik marathi news