मालेगावात रात्र रस्त्यावर काढणाऱ्या 'त्या' आरोग्यसेवकांची अखेर सोय झालीच! सकाळच्या वृत्ताची दखल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

40 जणांचे पथक गेल्या शनिवारी (ता. 2) मालेगावात रवाना करण्यात आले. परंतु त्यांची ज्या आदिवासी मुलांच्या वसतिगृहात निवासाची व्यवस्था करण्यात आली होती, त्याठिकाणी सोयीपेक्षा गैरसोयच अधिक होती. तेथील गैरसोय पाहता परिचारिकांनी त्याठिकाणी निवासाला नकार देत सारी रात्र उघड्यावर काढली होती. पण त्यानंतर...

नाशिक : जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण मालेगावात आहेत. वाढता संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सेवकांचे मनुष्यबळाची कमतरता होती. त्यामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयातून अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्यसेवकांना मालेगावात नियुक्त करण्यात आले. त्यासाठी परिचारिका व आरोग्यसेवक असा 40 जणांचे पथक गेल्या शनिवारी (ता. 2) मालेगावात रवाना करण्यात आले. परंतु त्यांची ज्या आदिवासी मुलांच्या वसतिगृहात निवासाची व्यवस्था करण्यात आली होती, त्याठिकाणी सोयीपेक्षा गैरसोयच अधिक होती. तेथील गैरसोय पाहता परिचारिकांनी त्याठिकाणी निवासाला नकार देत सारी रात्र उघड्यावर काढली होती. पण त्यानंतर...

सकाळ वृत्ताची दखल

मालेगावातील कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी नाशिकहून गेलेल्या परिचारिका व आरोग्य सेवकांची मालेगाव कॅम्पातील मुलींच्या वसतीगृहात करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची सुरू असलेली गैरसोय दूर झाली आहे. यासंदर्भातील वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते. या घटनेची दखल जिल्हा शल्यचिकित्सकांसह जिल्हा प्रशासनाने घेतली. सध्या या परिचारिकांची व्यवस्था मालेगाव कॅम्प परिसरात असलेल्या मुलींच्या वसतीगृहात करण्यात आलेली आहे. सदरचे वसतीगृह क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या रुग्णांची आरक्षित करण्यात आलेले होते. मात्र आता याठिकाणी परिचारिकांची निवास व भोजनाचीही येथेच व्यवस्था करण्यात आलेली आहे. याठिकाणीच परजिल्ह्यातून आलेल्या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही निवासाची व्यवस्था केली आहे. याबाबत परिचारिका व आरोग्य सेवकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच, भोजनही उत्कृष्ठ दर्जाचे देण्यात आले आहे. याठिकाणी किमान शंभर जणांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, निवासाचे स्थान न बदल्याची विनंती जिल्हा प्रशासन विभागाकडे केली आहे. परिचारिकांच्या गैरसोयीबाबत जिल्हा नर्सेस संघटनेने पाठिंबा देत आंदोलनाचा इशारा दिला होता. 

हेही वाचा > पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच!

परिचारिका व आरोग्यसेवकांची झालेली गैरसोय दूर

मालेगावात गेलेल्या परिचारिका व आरोग्यसेवकांची झालेली गैरसोय दूर झाली आहे. किमान सोयीसुविधा पुरेशी असावी. जेणेकरून त्यांना रुग्णसेवा करताना त्रास होणार नाही हाच यामागील उद्देश होता. - पूजा पवार, जिल्हा नर्सेस संघटना. 

हेही वाचा > ओढणीचा झोका बेतला चिमुरड्याच्या जीवावर...मुलाची अवस्था पाहून आईने फोडला हंबरडा​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health workers were finally provided in Malegaon nashik marathi news