ऑक्टोबर महिना ठरतोय दमदार! जिल्ह्यात परतीच्या पावसाची विक्रमी नोंद; अजूनही फटकेबाजी सुरुच

heavy rain
heavy rain

नाशिक : यंदा ऑक्टोबर महिना ठरतोय दमदार...जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाचा जोर कायम असून, आतापर्यंत १४५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्रमी पाऊस झाल्याने बळीराजाला मात्र त्रासलाच आहे. बागलाण तालुक्यात २८१ तर येवल्यात २५६ टक्के पाऊस झाला असून, मालेगाव मात्र या परतीच्या पावसाच्या तडाख्यापासून वाचले आहे.

पावसाचा ट्रेंड बदलला...

जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार फटकेबाजी सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाचा ट्रेंड बदलत असून, ऑक्टोबरमध्ये देखील पाऊस जोरदार हजेरी लावतो. १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात ९२३.९२ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना १ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत १३३८.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच १४४.९० टक्के एवढा पाऊस नोंदविला गेला आहे. यातही बागलाण मध्ये पावसाने कहर केला असून, २८१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल येवल्यात २५६.८ टक्के, देवळ्यात २१५ टक्के एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. नाशिक, इगतपुरी, पेठ, त्रंबकेश्वर, चांदवड, कळवण, सुरगाणा, निफाड आणि सिन्नर या तालुक्यांत देखील १०० टक्क्यांहुन अधिक पाऊस झाला आहे. सर्वात कमी ६.२ टक्के पावसाची नोंद मालेगाव तालुक्यात झाली आहे.

तालुकानिहाय पाऊस टक्केवारी

तालुका पाऊस (टक्के)

नाशिक १३९

इगतपुरी १३९

दिंडोरी ८९

पेठ १४१

त्रंबकेश्वर १०२

मालेगाव ६.०

नांदगाव ६१.२

चांदवड १०५

कळवण १२१

बागलाण २८१

सुरगाणा १४९

देवळा २१५

निफाड १४९

सिन्नर १६३

येवला २५६

एकूण १४५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com