औष्णिक वीज केंद्रात चिमणी पेटण्याची आशा; वीज मागणी २० हजार मेगावॉटवर

22.jpg
22.jpg

नाशिक : (एकलहरे) राज्यात अनलॉकमुळे बंद औद्योगिक वसाहती सुरू झाल्याने राज्याची मागणी २० हजार मेगावॉटवर गेल्याने नाशिक येथील किमान एक संच तरी सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. 

राज्यातील महानिर्मितीचे ३० पैकी २० संच सुरू

गेल्या मार्चपासून नाशिक औष्णिक वीज केंद्राची निर्मिती शून्यावर आहे. लॉकडाउनमुळे राज्याची विजेची मागणी अवघ्या १३ हजारांवर आली होती. त्यामुळे नाशिक, भुसावळ, कोराडी व परळी येथील वीजनिर्मिती संच बंद होते. टप्प्याटप्प्याने उद्योगधंदे पूर्ववत सुरू होऊ लागल्याने विजेच्या मागणीत वाढ होऊन कोराडी, भुसावळ व आता परळी येथून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. सध्या राज्यातील महानिर्मितीचे ३० पैकी २० संच सुरू आहेत. त्यात औष्णिक केंद्रांची वीजनिर्मिती पाच हजार ६१८ मेगावॉट होती. 

तर नाशिकमधून वीजनिर्मिती सुरू होईल

येत्या काळात मागणी आणखी वाढल्यास औष्णिक वीज केंद्रातूनही वीजनिर्मिती सुरू होईल, अशी कामगारांना आशा आहे. कोराडी येथील ६६० मेगावॉटचे तीन, खापरखेडाचे सर्व पाच, पारस- दोन, परळी- तीन, चंद्रपूर- पाच व भुसावळ- दोन संचांमधून वीजनिर्मिती सुरू आहे. सणासुदीत आणखी हजार ते दोन हजार मेगावॉटने मागणी वाढल्यास नाशिकमधून वीजनिर्मिती सुरू होईल. 

आजची राज्याची मागणी - २०४१३ मेगावॉट 
राज्याची वीजनिर्मिती - १३५८० मेगावॉट 

केंद्र क्षमता निर्मिती (मेगावॉट) 
नाशिक ६६० ००० 
कोराडी २४०० ८२६ 
खापरखेडा १३४० १०२६ 
पारस ५०० ३६५ 
परळी ११७६ ४९६ 
चंद्रपूर २९२० १७५५ 
भुसावळ १२१० ८७६ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com