भाजप, मनसेला दे धक्का! शेकडो कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये एंट्री

विक्रांत मते
Sunday, 27 September 2020

पक्षाची ध्येयधोरणे व शासकीय योजनांचा लाभ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेत पोचवून पक्षात भरीव कार्य करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी दिली. 

नाशिक : भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी (ता. २६) राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करत दे धक्का तंत्र अवलंबिले. सर्वसामान्य जनतेत पोचवून पक्षात भरीव कार्य करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी दिली.  

शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात जनहिताची कामे केली जात असून, नागरिकांच्या प्रश्‍नांवर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे. त्यामुळे युवक राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षित होत असल्याचा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी केला. पक्षाच्या मुंबई नाका येथील कार्यालयात प्रवेश सोहळा झाला. पक्षाची ध्येयधोरणे व शासकीय योजनांचा लाभ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेत पोचवून पक्षात भरीव कार्य करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी दिली. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

या वेळी शहर उपाध्यक्ष किरण पानकर, नीलेश सानप, मध्य विधानसभा अध्यक्ष जय कोतवाल, सिडको विभाग अध्यक्ष मुकेश शेवाळे, पूर्व विभाग अध्यक्ष सागर बेदरकर, राहुल कमानकर, करण आरोटे, रामेश्वर साबळे आदी उपस्थित होते.  

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds of BJP and MNS workers join NCP Youth Congress nashik marathi news