पोलिसांनी जप्त केलेली शेकडो वाहने धूळखात; सोडवून न नेल्यास होणर लिलाव

kalwan police staion
kalwan police staion

नाशिक/कळवण : विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली तसेच अपघातग्रस्त वाहने गेल्या अनेक वर्षांपासून कळवण पोलीस स्टेशनच्या आवारात धूळखात पडून असून पोलीस स्टेशनची बहुतांश जागा ह्या वाहनांनी व्यापल्याने ही वाहने संबंधित मालकांनी कार्यवाही पूर्ण करून घेऊन न गेल्यास या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.

अपघात घडल्यानंतर अपघातग्रस्त वाहने, तसेच पोलिसांकडून करण्यात आलेल्या विविध कारवायात जप्त करण्यात आलेली वाहने तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने पोलीस स्टेशनच्या आवारात पडून आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही वाहने या ठिकाणी धूळ खात असून, या वाहनांना नेण्याकरिता कोणीच पुढाकार घेत नाही. तसेच वाहनांची कागदपत्रे, इन्शुरन्स यामुळे संबंधित कंपनी, विक्रेते, वाहनधारक वाहन नेण्यासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढत नसल्याचे दिसून येते. यासोबत पोलीस स्टेशन आवारात संबंधित जागा अडगळीची होऊन बसल्याने अनेक समस्यांचा सामनासुद्धा करावा लागत असल्याचे वास्तव आहे. यातील काही वाहने मालकांनी कागदपत्रांची पूर्तता व कार्यवाही करून नेली असून अजूनही शेकडो वाहने पोलीस स्टेशन मध्ये पडीत आहेत. सदरील वाहने ज्यांची असतील त्या मालकांनी लवकरात लवकर कागदपत्रे पूर्तता करून वाहन घेऊन जावे व सूचना देऊनही वाहन घेण्यास कोणी न आल्यास त्या वाहनांचा लिलाव केला जाईल अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली आहे.

गाडी घेण्यास कुणी येईना 

कळवण पोलीस स्टेशन मध्ये जप्त असलेली वाहने घेण्यास मालकांनी येणे अपेक्षित असताना मालक येत नसल्याने गाड्या पडून आहेत.तर काही चांगल्या सुस्थितीतील गाड्याही धूळखात पडून असल्याने त्यांची दुरवस्था होण्या आधीच मालकांनी त्या घेऊन जाणे गरजेचे आहे.अन्यथा पोलीस स्टेशन लिलाव प्रक्रिया राबवणार आहे.

वाहन घेऊन जावे 

कळवण पोलीस स्टेशन मध्ये जमा असलेली वाहने ज्यांची असतील त्या मालकांनी कार्यवाहीची पूर्तता करून घेऊन जावीत.वेळोवेळी यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.काही व्यक्तींनी आपली वाहने सोडवून नेली आहेत.अजुन काही वाहने बाकी आहेत. लवकरात लवकर वाहने न नेल्यास उर्वरित वाहनांचा लिलाव केला जाईल.         - प्रमोद वाघ,पोलीस निरीक्षक, कळवण 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com