भयंकर प्रकार! "तिच्या" डोळ्यात आधी मिरचीपूड...तिला संपविण्याचा निश्‍चय..पण..

woman molest by taxi diver.jpg
woman molest by taxi diver.jpg
Updated on

नाशिक : चारित्र्याचा संशय घेत दोन मित्रांच्या सहाय्याने पत्नीचा चिराई घाटात खून केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पती व त्याच्या एका मित्राला जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 
चिराई घाट (ता. सुरगाणा) येथे 22 ऑक्‍टोबर 2013 ला उघडकीस आलेल्या या प्रकारात तिघांनी दरोड्याचा बनाव रचला होता.

असा घडला प्रकार

मृत प्रियंका राऊतचा (वय 23) पती राजेंद्र राऊत वडपाडा (सुरगाणा) येथील आदिवासी आश्रमशाळेत शिक्षक होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तो तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत असे. यातूनच प्रियंकाला संपविण्याचा निश्‍चय करून त्याने मित्र हरिश्‍चंद्र ऊर्फ हरी मोतीराम पवार व एका अल्पवयीन मुलाची मदत घेतली. 22 ऑक्‍टोबर 2013 ला राजेंद्र व प्रियंकास दिवाळी खरेदीसाठी नाशिकला जाण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून निघाले. रात्री साडेआठच्या सुमारास ते चिराई घाटात आले असता, आधीपासून त्या ठिकाणी असलेल्या दोघांनी दुचाकी रोखली. तिघांनी मिळून प्रियंका हिचा गळा आवळून आणि पोटात चाकू खुपसून खून केला. त्यानंतर राजेंद्रनेच सुरगाणा पोलिसांत दरोडेखोरांनी अडवून डोळ्यात मिरचीपूड फेकून प्रियंकाचे दागदागिने लुटले व तिचा खून केल्याचे सांगितले. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला; परंतु चौकशीत राजेंद्रच्या विसंगत जबाबामुळे पोलिसांचा संशय बळावला. कसून चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली.

दरोड्याचा रचला होता बनाव; प्रत्यक्ष साक्षीदार नसताना शिक्षा 

तत्कालीन पोलिस निरीक्षक एस. डी. अहिरे यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. नायर यांच्यासमोर हा खटला चालला. सरकार पक्षातर्फे ऍड. पंकज चंद्रकोर यांनी युक्तिवाद करताना 11 साक्षीदार तपासले. विशेष म्हणजे, या खटल्यात एकही प्रत्यक्ष साक्षीदार नसताना परिस्थितीजन्य पुरावे आणि वैद्यकीय साक्ष, खुनाच्या सुपारीसाठी दिलेले पैसे या आधारावर न्या. श्रीमती नायर यांनी दोघांना जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील अल्पवयीन संशयिताविरोधात बालन्यायालयात खटला चालविण्यात आला. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक सय्यद, सहाय्यक उपनिरीक्षक प्रमोद आढाव, महिला पोलिस ज्योती उगले यांनी पाठपुरावा केला. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com