पतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह सात जणांविरुद्ध गुन्हा

प्रमोद सावंत
Friday, 16 October 2020

भाग्यश्री व जितेंद्र सोनवणे हे पती-पत्नी आहेत. त्यांच्यात कौटुंबिक वाद होते. भाग्यश्रीसह इतर आठ जणांनी वेळोवेळी जितेंद्रला फोन करून तसेच समक्ष शिवीगाळ व दमबाजी केली होती.

मालेगाव (जि.नाशिक) : पतीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी व सात जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नेमके काय घडले?

अशी घडली घटना

भाग्यश्री व जितेंद्र सोनवणे हे पती-पत्नी आहेत. त्यांच्यात कौटुंबिक वाद होते. भाग्यश्रीसह इतर आठ जणांनी वेळोवेळी जितेंद्रला फोन करून तसेच समक्ष शिवीगाळ व दमबाजी केली होती. जितेंद्र याचा आई, वडील व नातेवाइकांसमवेत अपमान करत त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. ३१ ऑक्टोबर २०१९ ते १३ ऑक्टोबर २०२० दरम्यान वेळोवेळी हा प्रकार घडला. यामुळे जितेंद्रने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले असल्याची तक्रार जिभाऊ सोनवणे यांनी दिल्यानंतर भाग्यश्री सोनवणे हिच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

दुसरी घटना : दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा पैशांसाठी छळ 
मालेगाव : व्यवसायासाठी माहेरून दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून येथील आफरीनबानो इम्तियाज अहमद (वय २०, रा. आयेशानगर) या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला मारहाण करणाऱ्या पती इम्तियाज हुसेन सज्जाद हुसेन याच्यासह सहा जणांविरुद्ध आयेशानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband's suicide Crime against seven people including wife malegaon nashik marathi news