धक्कादायक! पानटपरीच्या आड गोरखधंदा; पोलिसीखाक्या दाखविताच गंभीर प्रकार उघडकीस

विनोद बेदरकर
Thursday, 17 September 2020

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. १६) सिन्नरला गस्त घालताना सिन्नर परिसरातील आडवा फाटा भागातील एका पानटपरीत चक्क अशा गोष्टी सापडल्या. ज्या धक्कादायक होत्या. काय आहे नेमका प्रकार वाचा पुढे.... ​

नाशिक : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. १६) सिन्नरला गस्त घालताना सिन्नर परिसरातील आडवा फाटा भागातील एका पानटपरीत चक्क अशा गोष्टी सापडल्या. ज्या धक्कादायक होत्या. काय आहे नेमका प्रकार वाचा पुढे.... 

पानटपरीवर छापा टाकला

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. १६) सिन्नरला गस्त घालताना सिन्नर परिसरातील आडवा फाटा भागातील एका पानटपरीत चक्क १८ तलवारी सापडल्या. याप्रकरणी टपरीचालक मयूर किसन बलक (वय २१, भाटवाडी, ता. सिन्नर) याला अटक केली आहे. त्याच्या टपरीत अवैधरीत्या तलवारींची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने ग्रामीण 
गुन्हे शाखेच्या पथकाने सिन्नर शहरातील आडवा फाटा येथील त्याच्या मालकीच्या पानटपरीवर छापा टाकला असता, पानटपरीत अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवलेल्या १८ तलवारी सापडल्या. सिन्नर पोलिसांनी गुप्त माहितीनुसार ही कारवाई केली.

हेही वाचा > "आई गं..तुझी आठवण येतेय.."भेदरलेल्या अवस्थेत चिमुरडा एकटाच रस्त्यावर; सोशल मिडियामुळे झाला चमत्कार

पोलिसीखाक्या दाखविताच सत्य बाहेर

छाप्यानंतर पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन पंचांसमक्ष संशयिताच्या मालकीच्या मयूर पानटपरीची झडती घेतली असता, टपरीच्या खालच्या बाजूस खाकी कागदी बॉक्समध्ये साठा सापडला. तलवारीबाबत पोलिसांनी विचारणा केली असता, सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या मयूरला पोलिसीखाक्या दाखविताच, तलवारी त्याच्या परराज्यातील मित्रांकडून विक्रीसाठी घेतल्याचे सांगितले. संबंधित तलवारी कोठून आणल्या आहेत व कोणाला विक्री करणार होता, याबाबतचा तपास स्थानिक गुन्हे शाखेतर्फे सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ, पवार, अहिरे, चव्हाणके, पोना लोखंडे, घुगे, गिलबिले, कातकाडे, काकड, लगड, बहिरम, शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

हेही वाचा > सहनशक्तीचा बांध तुटला! विवाहितेने विहिरीत उडी घेत संपविली जीवनयात्रा; काय घडले?

गंभीर प्रकार गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणला

सिन्नरला पानटपरीवर चक्क तलवारी विक्रीचा गंभीर प्रकार गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणला आहे. प्रभारी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या पथकाने अवैध शस्त्रास्त्र शोधमोहिमेत सिन्नरला एका पानटपरीतून तलवारी हस्तगत केल्या.

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal activities at Pan shop sinner nashik marathi news