esakal | "माझ्यावर विश्वास ठेवा हो" विवाहिता कळवळीने सांगत होती; अखेर सहनशक्तीचा बांध तुटलाच!
sakal

बोलून बातमी शोधा

married woman 123.jpg

"माझ्यावर विश्वास ठेवा हो..मी देखील तुमच्याच कुटुंबाची व्यक्ती आहे." विवाहिता सासरच्यांना कळवळीने सांगत होती. पण तरीही त्या कठोर काळजाच्या लोकांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले नाही. अखेर तिच्या सहनशक्तीचा बांध सुटलाच..आणि मग मागचा पुढचा कसलाच विचार न करता घेतला अखेरचा निर्णय...काय घडले वाचा.​

"माझ्यावर विश्वास ठेवा हो" विवाहिता कळवळीने सांगत होती; अखेर सहनशक्तीचा बांध तुटलाच!

sakal_logo
By
सुभाष पुरकर

नाशिक / वडनेरभैरव : "माझ्यावर विश्वास ठेवा हो..मी देखील तुमच्याच कुटुंबाची व्यक्ती आहे." विवाहिता सासरच्यांना कळवळीने सांगत होती. पण तरीही त्या कठोर काळजाच्या लोकांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले नाही. अखेर तिच्या सहनशक्तीचा बांध सुटलाच..आणि मग मागचा पुढचा कसलाच विचार न करता घेतला अखेरचा निर्णय...काय घडले वाचा..

काय घडले वाचा?
 पूजा आकाश गोसावी (रा. वडनेरभैरव, ता. चांदवड) तिच्या आई व वडील, नातेवाइकांबरोबर वेळोवेळी फोनवर बोलते. यावरून चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याकडे ट्रॅक्टर घेण्यासाठी एक लाख रुपये माहेरून आणावेत यासाठी तिला मारहाण, शिवीगाळ करून उपाशी ठेवून तिचा वारंवार छळ होत असल्याने स्वतःच्या मालकीच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. लक्ष्मण गोसावी (वय ५०, रा. गाजरावाडी, ता. निफाड) यांनी फिर्याद दिली आहे.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

सासरच्यांविरुध्द गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच वडनेरभैरव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीशक गणेश गुरव व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत विवाहितेचा पती, सासू, सासरे, दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडनेरभैरव परिसरात घडली आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

go to top