तुरीच्या शेतात मधोमध लपविले घबाड; पोलिसांनी छापा टाकला तेव्हा धक्काच

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

शेतात गांजा झाडाची लागवड केल्याची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलिसांनी शनिवारी (ता. १०) चांदवड तालुक्यातील शिरवाडे फाटा येथील तुरीच्या शेतासह इतर ठिकाणी पेट्रोलिंग करत २३० ओली गांजाची झाडे जप्त केली आहेत. 

नाशिक : शेतात गांजा झाडाची लागवड केल्याची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलिसांनी शनिवारी (ता. १०) चांदवड तालुक्यातील शिरवाडे फाटा येथील तुरीच्या शेतासह इतर ठिकाणी पेट्रोलिंग करत २३० ओली गांजाची झाडे जप्त केली आहेत. 

अशी आहे घटना

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी रविवारी (ता. 11) पिंपळगाव बसवंत, वडनेरभैरव, चांदवड परिसरात अवैध धंद्यांची माहिती मिळवली. अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना शिरवाडे फाटा येथे पाहणी केली. कांनमडाळी शिवारात दत्तू यादव चौधरी (वय ४५, रा.कांनमंडाळे, ता. चांदवड) याने स्वमालकीच्या शेतात गांजा झाडाची लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खात्री करण्याची शेतामधील तूर पिकाच्या आतमध्ये व इतर ठिकाणी गांजाच्या २३० झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत ९ किलो ३९० ग्रॅम वजनाचा सुमारे ४६ हजार ५०० रुपयांच्या गांजाची ओली झाडे जप्त केली. 

हेही वाचा > अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

याप्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक के. के. पाटील, पोलीस उपनिरीक्षक गुजर, पोलीस हवालदार गोसावी, चव्हाणके, पोलीस शिपाई गोसावी, मर्कड, वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या पथकाने केली.

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal cultivation of cannabis plants in Tulwad field nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: