परराज्यातून महाराष्ट्रात आणला जाणारा दारूसाठा जप्त; हरसूल पोलिसांची कारवाई

राहूल बोरसे
Monday, 21 September 2020

शनिवारी (ता. १९) दुपारी चारच्या सुमारास पोलिसांनी परराज्यातून महाराष्ट्रात आणला जाणारा दारूसाठा जप्त केला. हरसूल पोलीसांनी ही कारवाई केली आहे.

नाशिक / हरसूल : शनिवारी (ता. १९) दुपारी चारच्या सुमारास पोलिसांनी परराज्यातून महाराष्ट्रात आणला जाणारा दारूसाठा जप्त केला.हरसूल पोलीसांनी ही कारवाई केली आहे.

गाडीसह ४७ हजारांची विदेशी दारू जप्त
दारू रॉयल प्रीमियम, व्हिस्की, जॉन मार्टीन व्हिस्की व किंग फिशर, बियर जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयंक हसमुखलाल पटेल (वय २९, रा. उमरसाडी, देसाईवड, ता. पार्डी, जि. वलसाड) या संशयिताला अटक केली आहे. त्याचा दुसरा साथीदार सोहेल सलीम शिंधी (वय ३०, चिंचपाडा, मोठी वडियाल, जि. वलसाड) या दोघांविरोधात हरसूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात  राज्यातील होंडा सिटी कार (जीजे १५, सीजी ८०१७) या गाडीसह ४७ हजारांची विदेशी दारू जप्त केली. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

पाच लाखांचा मुद्देमाल हस्‍तगत 

उपविभागीय पोलिस अधिकारी भीमा शंकर ढोले, स्थानिक गुन्हे शोध शाखेचे निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल टकले, उपनिरीक्षक शिवाजी नागवे, नीलेश जाधव, सुनील तुंगार, संदीप दुनबळे, रतन शिंगाडे, उमेश बच्छाव, विलास जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.  

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal liquor seized from Harsul police nashik marathi news