स्कॉर्पिओच्या चोर कप्प्यात चक्क बारा लाखांची दारू! आणखीही संशयित गोष्टीचा खुलासा; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

विनोद बेदरकर
Thursday, 15 October 2020

भरधाव येणाऱ्या स्कार्पिओचा भरारी पथक एकने पाठलाग करीत दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या. या वेळी वाहनाची तपासणी केली असता धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला. 

नाशिक : भरधाव येणाऱ्या स्कार्पिओचा भरारी पथक एकने पाठलाग करीत दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या. या वेळी वाहनाची तपासणी केली असता धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला. 

लॉकडाउन काळापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विशेष लक्ष

लॉकडाउन काळापासून बेकायदा मद्य वाहतूक आणि विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग विशेष लक्ष ठेवून आहे. निरीक्षक मधुकर राख यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुत्रावे यांना मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मध्यरात्री पथकाने हरसूल- पेठ मार्गावर सापळा लावला असता ही कारवाई करण्यात आली. भरधाव येणाऱ्या (जीजे ०१ केएम ९३८७) स्कार्पिओचा भरारी पथक एकने पाठलाग करीत दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या. या वेळी वाहनाची तपासणी केली असता स्कार्पिओमध्ये बनवलेल्या चोर कप्प्यात राज्यात बंदी असलेला आणि दादरनगर हवेलीनिर्मित रॉयल स्टॅग, इम्प्रीयल ब्ल्यू, जॉन मार्टीन व्हिस्कीसह कासबर्ग, ट्युबर्ग, किंगफिशर बिअर आदींची खोकी मिळून आली. पथकाने दोघांना अटक करून वाहनासह १२ लाख १३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ही कारवाई दुय्यम निरीक्षक राम सुपेकर, जवान विलास कुवर, सुनील पाटील, धनराज पवार, अनिता भांड आदींच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक सुत्रावे करीत आहेत.  

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

स्कॉर्पिंओसह सव्वाबारा लाखांची दारू हस्तगत

राज्यात बंदी असलेली व दादरानगर हवेलीनिर्मित बेकायदा मद्याची वाहतूक रोखताना राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक एकच्या पथकाने गुजरात येथील दोघांच्या मुसक्या आवळल्या. हरसूल-पेठ रोडवरील धानपाडा शिवारात उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने स्कॉर्पिंओसह सव्वाबारा लाखांची दारू हस्तगत केली. 

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई

मिनेशभाई कांतिलाल पटेल (३०, रा. कुरगावमदन, ता. धरमपूर) व जयेशभाई अरविंदभाई हडपती (३४, रा. सलवानगाव, ता. वापी, जि. बलसाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दुय्यम निरीक्षक अरुण सुत्रावे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे, उपअधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal liquor seized nashik marathi news