गुजरातहून मध्यरात्री चोरीछुपे निघाली स्कॉर्पिओ'; भरारी पथकामुळे महाराष्ट्रात प्लॅन फिस्कटला!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

१४ ऑक्टोबर रोजी रात्री स्कार्पिओ निघाली.. स्कॉर्पिओच्या चोरकप्प्यात चोरीछुपे लपविले ते महाराष्ट्रात विक्रीसाठी आणायचे होते. पण महाराष्ट्रात येताच त्यांचा सगळ प्लॅन फिस्कटला..काय घडले नेमके वाचा..

नाशिक : १४ ऑक्टोबर रोजी रात्री स्कार्पिओ निघाली.. स्कॉर्पिओच्या चोरकप्प्यात चोरीछुपे लपविले ते महाराष्ट्रात विक्रीसाठी आणायचे होते. पण महाराष्ट्रात येताच त्यांचा सगळ प्लॅन फिस्कटला..काय घडले नेमके वाचा..

 स्कॉर्पिओच्या चोरकप्प्यात चोरीछुपे लपविले

(ता.१४) मध्यरात्री दिंडोरी भरारी पथकाने पेठ ते नाशिक रोडवरील सावळघाट इनामबारी शिवारात सापळा रचला. लॉकडाउन काळापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विशेष लक्षलॉकडाउन काळापासून बेकायदा मद्य वाहतूक आणि विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग विशेष लक्ष ठेवून आहे. निरीक्षक मधुकर राख यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुत्रावे यांना मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री पथकाने हरसूल- पेठ मार्गावर सापळा लावला असता ही कारवाई करण्यात आली. भरधाव येणाऱ्या (जीजे ०१ केएम ९३८७) स्कार्पिओचा भरारी पथक एकने पाठलाग करीत दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या. या वेळी वाहनाची तपासणी केली असता स्कार्पिओमध्ये बनवलेल्या चोर कप्प्यात राज्यात बंदी असलेला आणि दादरनगर हवेलीनिर्मित रॉयल स्टॅग, इम्प्रीयल ब्ल्यू, जॉन मार्टीन व्हिस्कीसह कासबर्ग, ट्युबर्ग, किंगफिशर बिअर आदींची खोकी मिळून आली. राज्यात बंदी असलेली व दादरानगर हवेलीनिर्मित बेकायदा मद्याची वाहतूक रोखताना राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक एकच्या पथकाने गुजरात येथील दोघांच्या मुसक्या आवळल्या. हरसूल-पेठ रोडवरील धानपाडा शिवारात उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने स्कॉर्पिंओसह सव्वाबारा लाखांची दारू हस्तगत केली.

दीव, दमणवरुन महाराष्ट्रात विक्रीस येणारा लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त;

महाराष्ट्रात बंदी असलेली व दादरा नगर हवेली निर्मित बेकायदा मद्य महाराष्ट्रात विक्रीसाठी आणले जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळाली. त्यानुसार विभागीय भरारी पथकाने सोमवारी रात्री सापळा रचला. पथकाने दोन संशयित कारची तपासणी केली असता कारमध्ये अवैध मद्यसाठा आढळून आला. पथकाने दोन कारमधील चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, दोन दिवसांपुर्वीच १४ ऑक्टोबर रोजी पथकाने दीपक पटेल याला स्कार्पिओच्या चोरकप्प्यात मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी हरसूल पेठ रोडवरील धानपाडा शिवारात अटक केली होती. तो जामिनावर बाहेर आला होता. त्याला दुसर्‍यांदा अटक करण्यात आली असून त्यांच्यावर ‘एक्साईज’कडून एमपीडीएअंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

 आठ दिवसांत तिसरी कारवाई
केंद्रशासित प्रदेशनिर्मित मद्याची अवैध वाहतूक नाशिक जिल्ह्यातून केली जात असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. महाराष्ट्रात बंदी असलेली व दादरा नगर हवेली निर्मित बेकायदा मद्याची वाहतूक रोखण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागास यश आले आहे. आठ दिवसात भरारी पथकाने तिसरी कारवाई केली आहे. पहिली कारवाई बुधवार, दि.१४ ऑक्टोबर रोजी रात्री स्कार्पिओच्या चोर कप्यात मद्याची वाहतूक करणार्‍या गुजरातमधील दोघांना पथकाने हरसूल पेठ रोडवरील धानपाडा शिवारात अटक केली. त्याच्याकडून पथकाने स्कार्पिंओसह सव्वाबारा लाखांची दारू जप्त केली. गुरुवार, दि.१५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दिंडोरी भरारी पथकाने पेठ ते नाशिक रोडवरील सावळघाट इनामबारी शिवारात सापळा रचून कारचालकाला अटक केली. त्याच्या ताब्यातून कारसह चार लाख ४ हजार ६४० रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. सोमवार, दि.१९ ऑक्टोबर रोजी विभागीय भरारी पथकाने हरसूलजवळ दोन कारमधून चौघांना अटक करत ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

दोन कारसह ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

पथकाने दीपक पटेल याला स्कार्पिओच्या चोरकप्प्यात मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी हरसूल पेठ रोडवरील धानपाडा शिवारात अटक केली होती. तो जामिनावर बाहेर आला होता. त्याला दुसर्‍यांदा अटक करण्यात आली असून त्यांच्यावर ‘एक्साईज’कडून एमपीडीएअंतर्गत कारवाई केली जाणार आहे.दमण व दीव येथील दोन कारमधून लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिकच्या विभागीय भरारी पथकास मिळाली. त्यानुसार विभागीय भरारी पथकाने सोमवारी (दि.१९) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळ सापळा टाकत चौघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून दोन कारसह ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारचालकाला अटक केली. त्याच्या ताब्यातून कारसह चार लाख ४ हजार ६४० रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. सोमवार, दि.१९ ऑक्टोबर रोजी विभागीय भरारी पथकाने हरसूलजवळ दोन कारमधून चौघांना अटक करत ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal liquor seized trimbkeshawar nashik marathi news