चार वर्षात नवीन रेल्वेगाडीचा विचार अशक्य; मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची माहिती

विनोद बेदरकर
Friday, 9 October 2020

भारतीय रेल्वेची ५९१ जवानांची देशातील सर्वात मोठी तुकडी आज नाशिक रोडला सामनगाव रोड वरील रेल्वे प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडली. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्या उपस्थितीत झालेल्या दिक्षांत समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते

नाशिक : मुंबई भुसावळ मार्गावर प्रचलित वेळापत्रक विस्कळित करुन नवीन गाड्या सुरु करण्याला अजिबात वाव नाही. या मार्गावर रेल्वेमार्ग विस्तारीकरणाचे अनेक प्रकल्प सुरु आहेत. २०२४ पर्यत विस्तारीकरणाची कामे चालणार असल्याने तोपर्यत नवीन रेल्वेगाड्या सुरु करणे अजिबात शक्य नसल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी सांगितले. 

शेतीमाल वाहातूकीसाठी चांगले नियोजन

मित्तल म्हणाले की, रेल्वे प्रवाशांना प्रवासासाठी वेटींग लिस्ट नसावी. असा रेल्वेचा मनोदय आहे. त्यासाठी विस्तारीकरणाची कामे सुरु आहेत. नाशिक-पुणे असो की मनमाड-इंदूर हे सगळे तेच प्रयत्न आहेत. रेल्वेमार्गाच्या चौपदरीकरणाचे कामे पूर्ण होईस्तोवर दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे थेट गाड्यांचा तूर्तास तरी विचार करता येणार नाही. शेतीमाल वाहातूकीसाठी मात्र चांगले नियोजन आहे असे स्पष्ट केले. 

रेल्वे सुरक्षा दलाच्या तुकडीचा दिक्षांत समारंभ 

भारतीय रेल्वेची ५९१ जवानांची देशातील सर्वात मोठी तुकडी आज नाशिक रोडला सामनगाव रोड वरील रेल्वे प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडली. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्या उपस्थितीत झालेल्या दिक्षांत समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रेल्वे सुरक्षा दलाचे आयुक्त अतुल पाठक हे पथक प्रमुख पाहुणे होते. प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य आर.पी.पवार व्यासपिठावर होते. तत्पूर्वी प्रशिक्षण दलाच्या मैदानावर दिक्षांत समारंभाचे शानदार संचलन झाले. तसेच त्यांच्या हस्ते ए एन नायर (आंध्रप्रदेश) यांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर शिव ओम शर्मा (उत्तर प्रदेश) यांनी मैदानी प्रकारात विजेतेपद राखले. दोघांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. 

हेही वाचा > विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे? 

देशातील पहिली तुकडी 

देशातील क्रमांक दोनचे सुरक्षा दल असा लौकीक असलेल्या भारतीय रेल्वे सुरक्षा दलाची ५९१ जवानांची नवी तुकडी आज रेल्वे सुरक्षेसाठी बाहेर पडली. तुकडीतील जवानांचे बहुसंख्य नातेवाईकांना आॅनलाईन सहभागाची संधी देण्यात आली होती. रेल्वे सुरक्षा दलाची आजची नाशिक रोड प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडलेली पहिली तुकडी आहे त्यात ५९१ जवान आहेत, देशात रेल्वे सुरक्षा दलाची एवढी मोठी तुकडी कधी बाहेर पडली नाही. त्यामुळे ही रेल्वेची पहिली मोठी तुकडी ठरली. देशातील वेगवेगळ्या विभागातील रेल्वेला सुरक्षा दलाचे जवान पुरविण्याचे काम या तुकडीतून होणार आहे. विशेष देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना प्रशिक्षण यंदा बंद ठेवण्यापर्यतची चर्चा सुरु असतांना या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण केले गेले. त्यामुळे नाशिक रोड तोफखाना केंद्र, महाराष्ट्र पोलीस अकादमी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सोबत रेल्वे सुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्र एक मोठी संस्था म्हणून उदयाला आली. 

हेही वाचा >  कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना

मित्तल म्हणाले 

- तुम्ही कृषी माल द्या आम्ही गाड्या देउ 
- विस्तारीकरणानंतर उत्तर, पुर्वेला गाड्या 
- रेल्वे प्रतिक्षा यादी संपविण्याचे प्रयत्न 
- २०२४ नंतर नवीन गाड्यां सुरु होतील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Impossible to think of a new train in four years nashik news