'शहीद पोलिस आधिकाऱ्यांच्या नावाने उपक्रम स्तुत्य' - उदय सामंत

विनोद बेदरकर
Sunday, 20 September 2020

पोलिस आयुक्तालयातर्फे शहरात शरणपूर रोड वर शहीद अशोक कामटे यांच्या नावाने पोलिसांचा शहरातील दुसरा पेट्रालपंप तर शहीद हेमंत करकरे यांच्या नावाने फायरिंग रेंजचे आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उध्दाटन झाले.

नाशिक : पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस प्रमाणिकपणे काम करतात व अथक मेहनत घेतात म्हणुनच सामान्य जनता सुखाने झोपु शकते, अशा पोलिस दलातील शहीद आधिकाऱ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमातून स्मरण करण्याचा पायंडा स्तुत्य आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. 

शहीद पोलिसांच्या नावाने पेट्रोल पंप

पोलिस आयुक्तालयातर्फे शहरात शरणपूर रोड वर शहीद अशोक कामटे यांच्या नावाने पोलिसांचा शहरातील दुसरा पेट्रालपंप तर शहीद हेमंत करकरे यांच्या नावाने फायरिंग रेंजचे आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उध्दाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या संकल्पनेतून पोलिस मुख्यालयात फायरिंग रेज सुरु झाली. तर टिळकवाडी सिग्नल जवळील शहिद अशोक कामटे पोलीस पेट्रोलपंप सुरु झाला. आज झालेल्या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त पांडे यांच्यासह भारत पेट्रोलियमचे महाराष्ट्र गोवा विभागाचे प्रमुख रमन मलिक, खासदार हेमंत गोडसे, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, विजय खरात, पोर्णिमा चैगुले-श्रींगी, भारत पेट्रोलियमचे विभागीय प्रबंधक राजा एम. तसेच आशुतोष पटवर्धन आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

सामंत म्हणाले की, शहीद कामटे व करकरे यांच्या नावाने पोलीस कल्याणासाठी पेट्रोलपंप व फायरिंग रेजचे दोन्ही उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण असून यानिमित्ताने दोन्ही शहिदांच्या कार्याचा गौरव केला आहे. अनोख्या पद्दतीने शहीद आधिकाऱ्यांचे स्मरण करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. या न्यायाने काम केल्यास पोलीस दलाने काम केल्यास महाराष्ट्र पोलीस दल जगातील एक नंबरचे पोलीस दल होईल . 

डिझेल टाकून उघ्दाटन 

सामंत यांनी पोलिस आयुक्तांच्या सरकारी वाहनात डिझेल भरुन पंपाचे उध्दाटन केले. तसेच यावेळी श्री सामंत यांनी भिष्मराज बहुददे्शीय हॉल, अरविंद अभ्यासकेची पाहणी केली. तसेच पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा सत्कार झाला

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

 

संपादन- रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of petrol pump by uday samant nashik marathi news