सावधान! सिन्नर तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ...'या' परिसरात सर्वाधिक रूग्ण

corona sinner.jpg
corona sinner.jpg
Updated on

नाशिक : (सिन्नर) शहरासह तालुक्यात कोरोबाधितांची संख्या वाढत आहे. तालुक्यात अवघ्या ९ दिवसात ११९ तर १८ दिवसांमध्ये २१९ कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी (ता. १७) दिवसभरात शहरात ९ तर ग्रामीण भागात १२ असे २१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने बाधितांची संख्या ३२३ वर पोहचली आहे.

या परिसरात आहे रूग्ण

आज शहरातील शिवाजीनगर, चितळेश्‍वर गल्ली, उज्वलनगर येथील नागरिकांचा बाधितांमध्ये समावेश आहे. यात बालकांचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील बहुतांश अहवाल पूर्वीच्या रुग्णांच्या निकट संपर्कातील संशियीतांचे आहेत. याशिवाय ग्रामीण भागात निऱ्‍हाळे, लोणारवाडी, वारेगाव , वडगाव-पिंगळा, कणकोरी , दोडी बु॥, कुंदेवाडी येथील नागरिकांचा समावेश आहे. तालुक्यात आत्तापर्यंत २४५ कोरोना बाधित बरे होऊन घरी परतले आहेत. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात दोन, खासगी रुग्णालयात ८ तर ६० रुग्ण सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

असे वाढले प्रमाण

तालुक्यात १३ एप्रिल रोजी वारेगाव येथे पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर ६ दिवसांनी दुसरा रुग्ण तर ११ दिवसांनी तिसरा रुग्ण आढळून आला होता. २७ दिवसानंतर २४ मे पर्यंत कोरोना रुग्णांची दुहेरी १२ एवढी संख्या होती. मे अखेरपर्यंत ४८ दिवसात ३२ तर जूनच्या दुसऱ्‍या आठवड्यापर्यंत ५६ दिवसात ३५ रुग्णसंख्येवरुन झेप घेत दोन दिवसातच पन्नाशी ओलांडली. पहिले पन्नास रुग्ण ५७ दिवसात आढळले तर पुढचे ५० रुग्ण केवळ २१ दिवसात आढळल्याने ७८ दिवसात रुग्णसंख्येने शतक गाठले. त्यानंतर मात्र प्रचंड वेगाने केवळ ८ दिवसातच रुग्णसंख्या २०४ झाली.

अवघ्या ९ दिवसात ही संख्या ११९ ने वाढून ३२३ पर्यंत पोहचली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी घरातच थांबावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील, डॉ. निर्मला गायकवाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com