धक्कादायक! पिकअप गाडीवर नाव "जय बजरंग बली" अन् आत मात्र अंगावर काटा आणणारी गोष्ट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pickup bajrang ozar.jpg

रविवारी (ता.२६) रात्री पावणे बाराच्या सुमारास ओझर साकोरे मिग या रस्त्यावरील गोंदकर वस्तीजवळ एक गाडी जात होती. ज्या गाडीवर जय बजरंग बली आणि कानिफनाथ असे नाव असलेली पिकअप (क्रमांक एमएच १५ बीजे ४३१४ ) होती. त्या पिकअप गाडीमध्ये जे काही होते ते अंगावर काटा आणणारे होते... 

धक्कादायक! पिकअप गाडीवर नाव "जय बजरंग बली" अन् आत मात्र अंगावर काटा आणणारी गोष्ट..

नाशिक / ओझर : रविवारी (ता.२६) रात्री पावणे बाराच्या सुमारास ओझर साकोरे मिग या रस्त्यावरील गोंदकर वस्तीजवळ एक गाडी जात होती. ज्या गाडीवर जय बजरंग बली आणि कानिफनाथ असे नाव असलेली पिकअप (क्रमांक एमएच १५ बीजे ४३१४ ) होती. त्या पिकअप गाडीमध्ये जे काही होते ते अंगावर काटा आणणारे होते... 
 

अशी घडली घटना...
रविवारी (ता.२६) रात्री पावणे बाराच्या सुमारास ओझर साकोरे मिग या रस्त्यावरील गोंदकर वस्तीजवळ गाडीवर जय बजरंग बली आणि कानिफनाथ असे नांव असलेल्या पिकअप गाडीमधून कत्तलीसाठी नेण्यात येणारी दोन गाई व चार वासरे ही त्यांची तोंडे दोरांने बांधून निर्दयपणे अवघडलेल्या अवस्थेत घेऊन जात असल्याचे शेतकरी अनिल बोरस्ते यांच्या लक्षात आले. याची खबर परिसरांत पसरल्याने नागरिकही मुक्या प्राण्यांची सोडवणुक करण्यासाठी सरसावले. कोरोनाचे गांभिर्य नसणाऱ्यांना त्यांनी चांगलाच धडा शिकवला पिकअप गाडीच्या काचा फोडल्या तर टायर टुबही फोडण्यात आले. पोलीस निरिक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन गाई व वासरे त्ताब्यात घेतली व नईम फारुख कुरेशी ( २८ ) शाहरूख सलीम कुरेशी (२३) अल्तमस सलीम कुरेशी (२१) सलीम सुलेमान कुरेशी ( ५०) सर्व राहणार चांदणी चौक ओझर व मुन्ना बशीर सैय्यद (३५ ) रा साकोरे मिग या पांच आरोपींना अटक करण्यात आली 

हेही वाचा > रंगात आला डाव...पण पोलिसांना बघून टांगा पलटी घोडे फरार...अन् मग चांगलीच झाली फजिती!

दोन लाख दोन हजार रुपयांचा माल

आदिवासी भागातून कोंबून आणण्यात आलेल्या जनावरानंतर सफेद रंगाची महींद्रा पिकअप, एमएच १५ईटी ३२८९ हिरो कंपनीची मोटारसायकल, बिना नंबरची मोटार सायकल असा दोन लाख दोन हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. दरम्यान पशुवैद्यकिय अधिकारी करण पवार यांनी या जनावरांवर औषधोपचार करून पहाणी करण्यात आली पोलीस निरिक्षक भगवान मथुरे यांनी चारा पाण्याची व्यवस्था केली.

हेही वाचा > धक्कादायक! टेम्पोवर बोर्ड अत्यावश्यक सेवेचा...अन् आतमध्ये मात्र भलतंच

गुन्हा दाखल करून अटक
ओझर पोलीस ठाण्यात आरोपींवर जिल्हाधिकारी यांचे संचारबंदी आदेशाचे उल्लंघन व भारतात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव संचारबंदी आदेश उल्लघंन १९६० कलम११, ११(१ ) घ (ड) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम६ (१) भांदवी १८८, ३४प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरिक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शना खाली पोह व्ही एस गायकवाड करत आहे 

Web Title: Caught Early Morning Pickup Carrying Cow Slaughter Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaNashik