नाशिक : स्मार्टसिटी अभियानातील हरित क्षेत्र विकासांतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी येथे ७५३ एकर क्षेत्रावर नगरपरियोजनेविरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर मंगळवारी (ता. २०) झालेल्या सुनावणीत राज्य शासनाकडे सहा आठवड्यांत प्रकल्पाचे सादरीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
स्मार्टसिटी अभियानातील हरित क्षेत्र विकासांतर्गत पंचवटी विभागातील मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात ७५४ एकर क्षेत्रांत नगरपरियोजना राबविली जाणार आहे. परंतु नगरपरियोजना राबवू नये, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे असून, त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. २४ ऑगस्टला नगरचना संचालनालयाने आराखड्याला मंजुरी दिली. त्यानंतर अंतिम उद्देश घोषणा प्रसिद्ध करण्यासाठी महासभेने मंजुरी दिली. न्यायालयात शेतकऱ्यांतर्फे वकिलांनी बाजू मांडताना न्यायालयासमोर बाब निदर्शनास आणल्यानंतर शासनाकडे आराखड्याचे सादरीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.