सिंचन क्षेत्रात ११ हजार हेक्टरनी वाढ; कालव्यांची गळती कमी करण्यात यश

palkhed.jpg
palkhed.jpg

नाशिक : पाणी वापर संस्थांची चळवळ उभी राहिलेल्या पालखेड पाटबंधारे विभागांतर्गत कालव्यांच्या गळतीचे प्रमाण साडेसहा टक्क्यांनी कमी करुन पाण्याच्या बचतीत यश मिळाले आहे. त्याचवेळी एका वर्षामध्ये सिंचन क्षेत्रात ११ हजार हेक्टरनी वाढ झाली आहे. सरकारने साडेआठ कोटी रुपये पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात बारा कोटींची पाणीपट्टी वसुली झाली आहे. 

सिंचन क्षेत्रात ११ हजार हेक्टरनी वाढ

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पालखेड पाटबंधारे विभागाचा ‘सिंचननामा-२०२०‘ आज प्रकाशित करण्यात आला. राज्यातील पाटबंधारे विभागांपैकी पालखेड विभागाचे सिंचन वर्ष अहवालाचे यंदाचे तेरावे वर्ष आहे. अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. नांदूरमधमेश्‍वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी, मालेगावचे कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी, पाणीवापर संस्थांचे प्रतिनिधी तथा ओझरच्या समाज परिवर्तन केंद्राचे सचिव लक्ष्मीकांत वाघावकर हे उपस्थित होते. 

उपशामुळे सिंचन क्षेत्रात वाढ

पालखेडचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने यांनी सिंचन अहवालामागील उद्देश स्पष्ट करत असताना गेल्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा उपस्थितांपुढे ठेवला. पालखेड पाटबंधारे विभागातंर्गत प्रवाही पाण्याच्या २१४ आणि उपशावर आधारित ५९ अशा एकुण २७३ पाणीवापर संस्था आहेत. त्यातंर्गत ९० हजार शेतकरी आहेत. यापूर्वी ६९ हजार ८४८ हेक्टर क्षेत्राला पाण्याची व्यवस्था झाली होती. सिंचन वर्षात ८० हजार ८५१ हेक्टरला पाणी मिळाले आहे. कालव्यासोबत धरणातून देण्यात आलेल्या उपशामुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. 

गळतीत झालेली घट 
(आकडे टक्केवारीमध्ये) 

कालवा लांबी किलोमीटर पूर्वीची गळती आताची गळती 
पालखेड डावा १२९ ६७ ५९ 
ओझरखेड डावा ६३ ६२ ५५ 
वाघाड डावा व उजवा ६० ६१ ५१ 
पुणेगाव डावा ६३ ६६ ६५ 

सिंचन वर्षामध्ये केंद्र सरकारचा पालखेड पाटबंधारे विभागाच्या कार्यासाठीचा पुरस्कार राज्याच्या जलसंपदा विभागास मिळाला. तसेच वलखेडच्या रंगनाथ गोपाळ पाटील पाणीवापर संस्थेला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाला आहे. - राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com