esakal | ऑक्सिजनची ७० टक्के जबाबदारी स्वीकारणे दिलासादायक - छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan1bujbal.jpg

२४ तासांत ३,६०० सिलिंडर भरण्याची क्षमता असून, ऑक्सिजन व्यतिरिक्त नायट्रोजन, कार्बन डाय-ऑक्साइड, आरगॉन अमोनिया आणि हेलियम या गॅसची निर्मिती होणार असल्याने उत्तर महाराष्ट्राची ऑक्सिजनची सोय झाली आहे. 

ऑक्सिजनची ७० टक्के जबाबदारी स्वीकारणे दिलासादायक - छगन भुजबळ

sakal_logo
By
राजेंद्र बच्छाव

नाशिक : (इंदिरानगर)कोरोनाच्या अडचणीत जाधव गॅसेस कंपनीने शहर आणि जिल्ह्यासाठी ७० टक्के ऑक्सिजन पुरवठा पुरविण्याची जबाबदारी स्वीकारणे ही दिलासादायक बाब आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नगरसेविका संगीता जाधव, माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी विल्होळीत सुरू केलेल्या जाधव गॅसेस कंपनीच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.

विविध स्वयंचलित यंत्रणा आणि सिलिंडर फिलिंगला प्रारंभ

श्री. भुजबळ म्हणाले, की कोरोना आपत्ती इष्टापत्ती मानून कायमस्वरूपी आरोग्य यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. त्यात ४० हजार लिटर क्षमतेचा प्रकल्प सोय ठरणार आहे. त्यात, २४ तासांत ३,६०० सिलिंडर भरण्याची क्षमता असून, ऑक्सिजन व्यतिरिक्त नायट्रोजन, कार्बन डाय-ऑक्साइड, आरगॉन अमोनिया आणि हेलियम या गॅसची निर्मिती होणार असल्याने उत्तर महाराष्ट्राची ऑक्सिजनची सोय झाली आहे. माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार नितीन भोसले, एचपीसीएलचे विभागीय व्यवस्थापक प्रलय जांभुळकर प्रमुख पाहुणे होते. संचालक अक्षय जाधव यांनी स्वागत केले. सायंकाळी पाचला प्रकल्पात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत येथील विविध स्वयंचलित यंत्रणा आणि सिलिंडर फिलिंगला प्रारंभ झाला. 

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पांडे, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, उपायुक्त पौर्णिमा चौगुले, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सरोज आहिरे, आमदार राहुल ढिकले, माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागूल, स्थायी सभापती गणेश गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेवक सुधाकर बडगुजर, सुदाम डेमसे, राहुल दिवे, अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त माधुरी पवार, उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश भामरे, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी नितीन गवळी आदी उपस्थित होते.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा