
नाशिक शहरात अनेक नवोदित कलावंत आहेत. कोरोनानंतरच्या काळातही संधी मिळत नसल्याने नियमित सराव करताना व्यावसायिकसह हौशी कलाकार/कलावंतांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनानंतरच्या काळातही कलाकार/कलावंतांना व्यासपीठ मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
नाशिक : नाशिक शहरात अनेक नवोदित कलावंत आहेत. कोरोनानंतरच्या काळातही संधी मिळत नसल्याने नियमित सराव करताना व्यावसायिकसह हौशी कलाकार/कलावंतांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनानंतरच्या काळातही कलाकार/कलावंतांना व्यासपीठ मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
कलावंतापुढे मोठे संकट
नाशिकमध्ये अनेक स्पर्धांना वर्षभरापासून ब्रेक लागला आहे. या स्पर्धांच्या निमित्ताने कलाकारांना व्यासपीठ मिळण्याबरोबर नेपथ्य, प्रकाशयोजना, नाट्यसंगीत आदी पडद्यामागील महात्वाच्याबाबी त्यातील बारकावे शिकण्यास मदत होत असते. सगळ्या क्षेत्रात गेल्यावर्षात मोठे नुकसान झाले आहे. चांगल्या कलावंतांना व्यासपीठ मिळत नसल्याने कलाकारांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. कोरोना काळानंतरही सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्यामुळे जे कलाकार कलावंतांचे संसार यासर्व गोष्टीवर चालतात त्यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यातील अनेक कलाकार कर्जबारीच्या खाईत अडकले आहे. त्यांना उपजिविकेसाठी दुसरे साधन शोधण्याची वेळ आली आहे. पडद्यामागील कलाकारांनीही दुसरा पर्याय निवडला असून सर्व सुरळीत केव्हा होते कलाकार/कलावंत वाट बघत असल्याचे दिसत आहे. व्यावसायिक नाटक नवीन वर्षात सुरू जरी झाले असले तरी त्यांची संख्या पाहता सर्वकाही सूरळीत होण्यासाठी आणखी कालावधी लागणार असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात
व्यावसायिक रंगभूमी आणि हौशी प्रकार असले तरी वर्षभरात हौशी नाटकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. व्यावसायिक नाटकांचे पडद्यामागील कलाकारांच्या अडचणी वाढल्या आहे. कोरोनामुळे नाटकांचे प्रयोग थांबले आहेत. ती खंत आहे. कोरोनाबरोबर हौशी कलाकारांना जागेची उपलब्धता होत नसल्याने प्रयोगांची संख्या कमी झाली आहे. नाटकांचा महोत्सव न झाल्याने पोकळी सगळ्यांना जाणवत आहे.
- धनजंय वाभळे, नाशिक
कलावंतांचे कुटुंब या सर्वावर अवलंबून आहे. त्यांना या सगळ्यांचा फटका बसला आहे. सगळ्या कलाकारांनी एकत्र येऊन गरजू कलाकार कलावतांना मदतीसाठी पुढे यायला हवे, प्रयोग होत नसल्याने त्यांचे हाल होत आहे. नाटकांच्या प्रयोगाला परवानगी मिळाली तरी प्रेक्षक मिळतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- अहमद शेख, नाशिक
हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा
कलाकारांची प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे, यासाठी त्यांची धडपड असते. कमी भांडवलात हौशी कलाकारांना कोरोनाचे नियम पाळत प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. कलाकरांना जागा उपलब्ध होत नसल्याने सराव करता येत नाही.
- निता कोठेकर, नाशिक