esakal | तो म्हणाला...मी फ्रिज दुरुस्ती करणारा आहे...अन् तो घरात घुसल्यावर कुटुंबियांना धक्काच 
sakal

बोलून बातमी शोधा

 refrigerator.jpg

तो म्हणाला..तुम्ही कॉल केला होता ना.. मी तोच फ्रीज दुरूस्ती करणारा आहे..काय झालयं तुमच्या फ्रीजला..असे विचारल्यावर कुटुंबियांनी सांगितले तिथे किचनमध्ये आहे. अन् अशाप्रकार तो घुसला किचनमध्ये..आणि मग जे काही घडले त्याने कुटुंबियांना मोठा धक्काच बसला. 

तो म्हणाला...मी फ्रिज दुरुस्ती करणारा आहे...अन् तो घरात घुसल्यावर कुटुंबियांना धक्काच 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तो म्हणाला..तुम्ही कॉल केला होता ना.. मी तोच फ्रीज दुरूस्ती करणारा आहे..काय झालयं तुमच्या फ्रीजला..असे विचारल्यावर कुटुंबियांनी सांगितले तिथे किचनमध्ये आहे. अन् अशाप्रकार तो घुसला किचनमध्ये..आणि मग जे काही घडले त्याने कुटुंबियांना मोठा धक्काच बसला. 

असा घडला प्रकार

देवरे फ्रीज दुरूस्तीसाठी घेवडे यांच्या घरी आला होता. घरात कोणाचे लक्ष नसल्याचे पाहुण त्याने किचनमध्ये एका वाटीत ठेवलेली सोन्याची चैन लंपास कली, असा आरोप घेवडे यांनी केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार व्ही. जे. निसाळ करत आहेत.

हेही वाचा > पत्रकारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोर सरपंचावर कोरोनाची मेहेरबानी...की आणखी काही? संशय कायम

गुन्हा दाखल

फ्रीज दुरूस्तीसाठी आलेल्या संशयिताने घरातील किचनमध्ये ठेवलेले ८० हजार रूपयांचे दागिणे लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.१८) सायंकाळी अमृतधाम येथील साईनगरमधील स्क्मिणी हाईट्स येथे घडली. याप्रकरणी निलम चंदुमल घेवडे (साईनगर, अमृतधाम, पंचवटी) यांनी पंचवटी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित रंगराव पंडित देवरे (२१, गोपाळनगर, अमृतधाम) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा > दिलासादायक! नाशिक शहरात कोरोनाला लागतोय "ब्रेक'...ही आहेत कारणे..