महानिर्मितीची वाटचाल अजूनही मंदावलेलीच; 'या' केंद्रांना उत्तम दर्जाच्या कोळशाची प्रतिक्षा

 nashik thermal power station2.png
nashik thermal power station2.png

एकलहरे (नाशिक) : राज्याची विजेची मागणी २२ हजार ५०० वर जाऊन पोचली असली तरी महानिर्मितीची वाटचाल अजूनही मंदावलेली दिसून येत आहे. यामुळे अनेक संच रेड झोनमध्ये आहे. नाशिक औष्णिक वीज केंद्र वगळता कोरडी, खापरखेडा, परळी, चंद्रपूर, भुसावळ येथे नवीन प्रकल्प उभारले गेले आहेत. परंतु आजही या संचांमधून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती केली गेली नसल्याचे कामगार सांगतात. कारण या केंद्रांना उत्तम दर्जाचा कोळसा पाच हजार सीव्हीचा मिळावयास हवा तो मिळत नाही. तो तीन हजार ३२०० सीव्हीचा मिळतो. त्यामुळे हीट रेट (उष्मांक) वाढून निर्मिती दर वाढतो. 

निर्मिती निम्म्या क्षमतेने सुरू

नवीन संच असूनही पूर्ण क्षमतेने निर्मिती केली जात नसल्याने खर्चात वाढ होत आहे. वीजनिर्मिती दर वाढले की एमओडीमध्ये ही संच बंद ठेवण्याचे आदेश दिले जाते किंवा बॅकिंग डाउनमध्ये चालविण्यास सांगितले जाते. राज्याची मागणी साडेबावीस हजारांवर जाऊन पोचली असली तरीही महानिर्मिती जोमाने सुरू झाल्याचे चित्र दिसत नाही. कोराडी एक संच नूतनीकरण व आधुनिकीकरण केले आहे. कोरडी, परळी, चंद्रपूर, भुसावळ, खापरखेडा येथे नवे संच उभारले आहे. पण २०१२ ते २०१६ या आर्थिक वर्ष कालावधीत वीजनिर्मितीत ज्या नाशिक औष्णिक वीज केंद्राने सातत्याने क्रमांक १ ते ३ स्थान अबाधित ठेवले त्या नाशिकवर आलेली संक्रांत टळली नाही. राजकीय मानसिकता व प्रशासकीय उदासीनता यासाठी कारणीभूत आहे. आजमितीला कोट्यवधींची बचत करून देणारा व उच्चांकी कामगिरी करणारा वीज केंद्रात फक्त एक संच सुरू आहे. दोन संच खितपत पडले आहे. राज्यातील इतर वीज केंद्रातील संचांमधून बॅकिंग डाउन मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने निर्मिती निम्म्या क्षमतेने सुरू आहे. कोळसा चांगल्या सीव्हीचा मिळाल्यास महागाईची वीज खरेदी करण्याची गरज पडणार नाही. 

हवा तसा निर्मितीदर नाहीच

उत्तम दर्जाचा कोळसा मिळाला तर आजही नाशिक औष्णिक वीज केंद्रातील संच तसेच इतर वीज केंद्रातील नवीन संच पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करू शकतात. खासगी उद्योगास उत्तम प्रतीचा तर महानिर्मितीला कमी दर्जाचा कोळसा मिळाल्याने खर्च वाढतो व हवा तसा निर्मितीदर मिळत नाही. राखेचे प्रमाण वाढते राहते. 

नाशिक औष्णिक वीज केंद्राने सातत्याने विक्रमी वीजनिर्मिती करून चाळिशीतही आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. कोळसा उत्तम प्रतीचा मिळाला तर निर्मिती दर कमी येऊ शकतो. येथील प्रस्तावित प्रकल्प होणे गरजेचे आहे. - सागर जाधव, उपाध्यक्ष, प्रकल्प बचाव संघर्ष समिती  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com