जेव्हा "नगरसेविका" प्रभागात गल्लोगल्ली औषध फवारणी करतात.. तेव्हा न्यायाधिश देखील करतात कौतुक!

corporator hemlata.png
corporator hemlata.png

नाशिक  : कोरोनामुळे सध्या देशभरातील स्थिती पाहता चिंतेचे वातावरण आहे. एकंदरीत पंतप्रधानांकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.  त्यामुळे तुमचे नगरसेवक तुम्हाला भेटले का? असा संदेश सध्या सोशल मिडीयावर फिरत आहे. अनेक लोकप्रतिनिधी, पोलिस, कर्मचारी त्याला अपवाद ठरले आहेत. या संकटाच्या काळात त्यांचे काम अधिक उजळपणे नागरिकांपुढे आले आहे.

या नगरसेविकेला आपल्या प्रभागातील नागरिकांची काळजी..

कॉंग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील मात्र गेले तीन दिवस आपल्या प्रभागात गल्लोगल्ली फवारणी करीत फिरत आहेत. नागरीकांना सावधानता बाळगण्याच्या सुचना करीत आहेत. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत गल्लोगल्ली दर्शन देणाऱ्या या नगरसेविका वेगळ्याच ठरल्या आहेत.
राज्यभर कोरोना विरोधात मुख्यमंत्र्यांपासून तर प्रशासनातील प्रत्येक लहान मोठा अधिकारी कर्मचारी सक्रीय आहे. एकवीस दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केल्यावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अशा स्थितीत सोशल मिडीयावर अजून एकही पत्रकार, कोरोना ग्रस्ताची मुलाखत घ्यायला गेला नाही तुमचा नगरसेवक तुम्हाला भेयाटला आला का? आमदार-खासदार काय करतात? असे खोचक प्रश्‍न सतत फिरत असतात. मात्र, अनेक लोकप्रतिनिधी, पोलिस, कर्मचारी त्याला अपवाद ठरले आहेत. या संकटाच्या काळात त्यांचे काम अधिक उजळपणे नागरिकांपुढे आले आहे. 

नागरिकांचा देखील तेवढाच चांगला प्रतिसाद

फवारणी दरम्यान अनेक नागरीक देखील तेवढाच चांगला प्रतिसाद देत त्यांची विचारपुस करतात. शासकीय कर्मचारी व न्यायाधीशांची वसाहत या प्रभागात आहे. तेथे फवारणीला गेल्यावर तर अनेकांनी समाधान व्यक्त केले. एका न्यायाधिशांनी त्यांची विचारपुस करुन ;तुम्ही आधी पाणी घ्या अशा शब्दांत आपुलकी व्यक्त केल्याने नगरसेविका पाटील यांनाही आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळाले.

महापौरांशी भेटून त्याचे नियोजन करता येईल
सबंध प्रभागात फवारणी केल्यावर नागरीकांनी मला भेटून समाधान व्यक्त केले. संपूर्ण शहरात अशी फवारणी व्हावी अशी सूचना अनेकांनी केली. महापौरांशी भेटून त्याचे नियोजन करता येईल. त्यासाठी मी प्रयत्नशील आहे -डॉ. हेमलता पाटील, नगरसेविका

न थकता फवारणीवर देखरेख ठेवतात.

कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या आणि नगरसेविका डॉ. हेमलता पाटील गेल्या तीन दिवसांपासून आपल्या प्रभागात सकाळपासून सायंकाळपर्यंत कोरोना प्रतिबंधासाठी औषध फवारणी करण्यात व्यग्र आहेत. प्रत्येक भागात जाऊन त्या फवारणी करतात. फवारणीचा ट्रॅक्‍टर फिरत असताना समर्थक कार्यकर्तेही त्यांच्यासोबत असतात. यावेळी नागरिकांना भेटून अडचणी, सुचनाही विचारतात. चार नगरसेवकांचा प्रभाग असल्याने त्यात आपला कोणता, परका कोणता असा फरक करता येत नाही. त्यामुळे त्यांनी सबंध प्रभागात स्वतः फिरून फावरणी केली आहे. सकाळी सुरु झालेली फवारणी अगदी रात्रीही सुरु असते. त्या न थकता त्यासोबत फिरून फवारणीवर देखरेख ठेवतात.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com