कौशल्य विकास योजना : नोकरीइच्छुकांच्या लाभासाठी नोंदणीकार्ड आधारला लिंक आवश्यक

मनिष कुलकर्णी
Tuesday, 22 September 2020

सेवायोजन कार्यालयातील नावनोंदणीत आधारकार्ड नोंदणी क्रमांकाचा समावेश न केलेल्या उमेदवारांनी आपला यूजर आयडी व पासवर्ड वापरून आधारकार्ड क्रमांकासह आवश्‍यक सर्व माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर ३० सप्टेंबरपर्यंत अद्ययावत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक :  कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर किंवा कार्यालयात नावनोंदणी केलेल्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांचे नावनोंदणीमध्ये आधारकार्ड ऑनलाइन पद्धतीने लिंक करून नोंदणीतील माहिती अद्ययावत करणे आवश्‍यक आहे.

तर वेबपोर्टलवरील नोंदणी रद्द होणार

सेवायोजन कार्यालयातील नावनोंदणीत आधारकार्ड नोंदणी क्रमांकाचा समावेश न केलेल्या उमेदवारांनी आपला यूजर आयडी व पासवर्ड वापरून आधारकार्ड क्रमांकासह आवश्‍यक सर्व माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ३० सप्टेंबरपर्यंत अद्ययावत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वेबपोर्टलवरील उपलब्ध असलेली नोकरी/व्यवसाय आदींबाबतची माहिती प्राप्त करण्यासाठी वेळोवेळी वेबपोर्टलवर लॉग-इन करावे. ही माहिती ३० सप्टेंबरपर्यंत वेबपोर्टलवर अद्ययावत न केल्यास वेबपोर्टलवरील नोंदणी रद्द करण्यात येईल. वेबपोर्टलवरील ही माहिती अद्ययावत करताना काही समस्या येत असल्यास कार्यालयाच्या ०२५३-२९७२१२१ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा nashikrojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री. संपत चाटे यांनी केले आहे.  

हेही वाचा > आश्चर्यच! आठवड्यात गायीने दिला दोनदा जन्म; डॉक्टरांच्या गोठ्यातील किमया  

 

संपादन - रोहित कणसे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kaushal vikas yojana adhar registration nashik marathi news