esakal | "खडसेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढणार" - छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse chhagan bhujba

विरोधी पक्षाचा नेता म्हणून त्यांची त्यावेळची भुमिका योग्य असेल परंतू आता त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भुमिका पटली असेल तर त्यांचे स्वागतच

"खडसेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढणार" - छगन भुजबळ

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक - भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देवून राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करणाया माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे स्वागत करताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा होवून राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद आणखी वाढणार असल्याचे सांगितले. 

भुजबळ म्हणाले, एकनाथ खडसे अनुभवी नेते आहेत, राज्यात भाजपला मोठे करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. राज्यात विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. अनेक वर्षे ते मंत्री होते. त्यांच्या या अनुभवामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद नक्कीच वाढणार आहे. खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर अनेकदा टिका केली असली तरी विरोधी पक्षाचा नेता म्हणून त्यांची त्यावेळची भुमिका योग्य असेल परंतू आता त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भुमिका पटली असेल तर त्यांचे स्वागतच असल्याची प्रतिक्रिया  भुजबळ यांनी दिली. 

हेही वाचा >  हॉटेलमधील आचाऱ्याच्या मृत्यूचे गुढ रहस्य; संशयास्पद घटनेचा पोलीसांकडून शोध सुरू

हेही वाचा > रहाडी, खरवंडीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत सात ठिकाणी चोऱ्या 

go to top