लेकीने बापाच्या कष्टाचं केलं चीज...गवंडी खैरनारांच्या घरात यशाची 'खुशी'..!

राजेंद्र दिघे : सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

अभ्यासाचे नियोजन करत ग्रंथालयाचा आधार घेत मोबाईल वर्षभर दूर ठेवल्याने यशस्वी झाली, असे खुशीने सांगितले. शब्दांच्या दुनियेत रमणाऱ्या खुशीला वाचन व कविता करण्याचा छंद आहे. ती गायन कलाही जोपासत आहे.

नाशिक : (मालेगाव कॅम्प) घरची परिस्थिती बेताचीच, सतत आई- वडिलांची मोलमजुरी. बांधकामावर गवंडी काम करणाऱ्या कॅम्प भागातील पठाडे गल्लीतील चंद्रकांत खैरनार यांच्या खुशीने बारावीत ८३.६९ टक्के घेऊन केबीएच कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. खुशीला भविष्यात चार्टर्ड अकाउंटंट होण्याची इच्छा आहे. 

खुशीला वाचन व कविता करण्याचा छंद

बारावीपर्यंत शिकलेल्या वडिलांनी गवंडीकाम करत शिक्षणाचा खर्च केला. आई मनीषाही नववी शिकल्या असून, शिवणकाम करून कौटुंबिक हातभार लावतात. लेकीने खूप शिकावे, ही आईची सदैव तळमळ. दहावीपर्यंत आरबीएच विद्यालयात शिक्षण घेत ८६.६० टक्के मिळवले. अभ्यासाचे नियोजन करत ग्रंथालयाचा आधार घेत मोबाईल वर्षभर दूर ठेवल्याने यशस्वी झाली, असे खुशीने सांगितले. शब्दांच्या दुनियेत रमणाऱ्या खुशीला वाचन व कविता करण्याचा छंद आहे. ती गायन कलाही जोपासत आहे. खुशीला अमोल अहिरे, प्राचार्य अनिल पवार, प्रफुल्ल निकम, पद्मावती घिवारे यांचे मार्गदर्शन लाभले. मुलीने कॉमर्स क्षेत्रात गुण मिळवत करिअर करायचा निर्णय घेतला आहे. तिच्या शिक्षणासाठी कष्ट करण्याची तयारी असल्याचे श्री. खैरनार यांनी सांगितले. 

हेही वाचा > दुर्देवी! धरणात पोहण्यासाठी गेलेल्या पोलीसासह दोन मित्रांचा बुडून मृत्यू...परिसरात खळबळ

घरच्या परिस्थितीची जाण होती. सातत्याने नियमित अभ्यास केला. वडिलांचे कष्ट नेहमीच बघतेय. आनंदाने खूशी नाव ठेवणाऱ्या आई- वडिलांचे स्वप्न ‘सीए’ होत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे. विद्यार्थांनी एकाग्रता बाळगून अभ्यासात सातत्य ठेवावे. - खुशी खैरनार  

हेही वाचा > थरारक! बायकोच्या चारित्र्यावर होता नवऱ्याला संशय...मध्यरात्रीच केला 'असा' अंगावर काटा आणणारा प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khushi Khairnar from Malegaon Camp achieved her 12th success nashik marathi news