सारेच संशयास्पद! झोळीतून अचानक बालिका गायब...जाताना येताना कोणीच नाही दिसले ...पोलीसही संभ्रमात

 baby 1.jpg
baby 1.jpg

नाशिक/मालेगाव : रेखा चव्हाण व त्यांचे पती रावसाहेब चव्हाण मोलमजुरी करून पोट भरतात. रावसाहेब यंत्रमाग कामगार आहेत. फासेपारधी समाजातील रावसाहेब शिवनगरमध्ये उदरनिर्वाहासाठी सासुरवाडीला आले आहेत. सोमवारी दुपारी मुलीला दूध पाजून झोळीत टाकले. नंतर घरात स्वयंपाक करीत होते. नंतर पाहिले असता, बालिका बेपत्ता आढळली. त्यानंतर जे काही घडले ते सारे संशयास्पद होते. 

त्यानंतर जे घडले ते संशयास्पद...पोलीसही संभ्रमात

शहराजवळील द्याने शिवनगर भागातील युती प्रोसेसजवळील रेखा चव्हाण यांच्या घरातून झोळीतून अडीच महिन्यांच्या बालिकेला पळविले. हा प्रकार सोमवारी दुपारी घडला. बालिकेच्या आईने रमजानपुरा पोलिस ठाण्यात सायंकाळी बालिकेला पळविल्याची तक्रार दिली. पोलिस या बालिकेचा शोध घेत असताना, मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास शिवनगरजवळील घरापासून शंभर मीटरवर पाण्याच्या डबक्‍यात या बालिकेचा मृतदेह मिळाला.घटनेचे वृत्त समजताच अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक रत्नाकर नवले, निरीक्षक बाळासाहेब थोरात, उपनिरीक्षक देशमुख सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी पळविलेली बालिका मृतावस्थेत मिळून आल्याने पोलिसही बुचकळ्यात पडले.

सारेच संशयास्पद..असे कसे?
रेखा चव्हाण व त्यांचा पती रावसाहेब चव्हाण मोलमजुरी करून पोट भरतात. रावसाहेब यंत्रमाग कामगार आहेत. फासेपारधी समाजातील रावसाहेब शिवनगरमध्ये उदरनिर्वाहासाठी सासुरवाडीला आले आहेत. सोमवारी दुपारी मुलीला दूध पाजून झोळीत टाकले. नंतर घरात स्वयंपाक करीत होते. नंतर पाहिले असता, बालिका बेपत्ता आढळली. तिला कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार रेखा चव्हाण यांनी दिली आहे. मात्र, त्यांचे घर एका खोलीचे आहे. झोळीतून मुलीला कोणी पळवून नेल्यास घरात येताना कोणी दिसले कसे नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.

अहवाल आल्यानंतर दिशा स्पष्ट होईल

रमजानपुरा पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह परिसरातील रहिवाशांचे जबाब नोंदवीत चौकशीस सुरवात केली आहे. दुपारी बालिकेचा मृतदेह चिकित्सेसाठी धुळे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. शवचिकित्सा अहवाल आल्यानंतर या प्रकरणाची दिशा स्पष्ट होईल, असे पोलिस निरीक्षक थोरात यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com