रात्रीचा थरार! मित्राची मर्सडिज कार अडवित जबरदस्तीने अपहरण; पोलीसांचा शोध सुरू

mercedies car.jpg
mercedies car.jpg

नाशिक / मालेगाव : सफेद व काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या त्याच्या सात साथीदारांनी मर्सडिज कारला कार आडवी लावून कारमध्ये बसलेल्या मित्राला जबरदस्तीने ओढून घेत कारमधून अपहरण करीत फरारी झाले.पण याचे नेमके कारण काय तसेच अपहरण केल्याचे नेमके कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत.

मध्यरात्रीचा थरार...मित्राचेच केले अपहरण

राजेंद्र कदम (३८, रा. निमगुले) यांनी दिलेल्या तक्रारीत अमित पगार (रा. पाडळदे, ता. मालेगाव) याच्यासह सफेद व काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या त्याच्या सात साथीदारांनी मर्सडिज कारला कार आडवी लावून कारमध्ये बसलेला मित्र प्रवीण कदम याला जबरदस्तीने ओढून घेत कारमधून अपहरण करीत फरारी झाले. संशयितांनी आपला मोबाईलही हिसकावून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सोमवारी (ता.२८) पहाटे तालुका पोलिसांनी अपहरण व रस्तालुटीचा गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक नरेंद्र भदाणे व सहकाऱ्यांनी मध्यरात्रीच घटनास्थळी भेट देऊन वेगाने तपासचक्र फिरविले.

दहा हजारांचा सॅमसंग मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला.

मनमाड-मालेगाव रस्त्यावरील कौळाणे शिवारातील हॉटेल साईप्रसादजवळून दोन वेगवेगळ्या कारमधून आलेल्या आठ जणांनी निमगुले येथील प्रवीण केशव कदम (वय ४२) यांचे अपहरण केले. संशयितांनी प्रवीण यांचा साथीदार राजेंद्र कदम यांच्याजवळील दहा हजारांचा सॅमसंग मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. रविवारी (ता.२७) रात्री पावणेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. आर्थिक व्यवहारातून व पैशांच्या देवाणघेवाणीतून हे अपहरण झाल्याचे समजते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने चार संशयितांना चौकशीकामी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

चौघे संशयित गुन्हे शाखेच्या ताब्यात; आर्थिक देवाणघेवाणीचा संशय ​

जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. भदाणे यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील व सहकाऱ्यांना समांतर तपासणी चौकशी करण्याचे निर्देश दिले. सोमवारी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघा संशयितांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा गुन्हे शाखेचे पथक या चौघांना घेऊन मालेगावकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. अपहरण केलेल्या प्रवीण यांचा जबाब व संशयितांच्या चौकशीनंतरच अपहरणाचे निश्‍चित कारण समजू शकेल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com