धक्कादायक! गळा चिरुन नाशिकमध्ये 23 वर्षीय महिलेची हत्या; संशयावरुन पतीस अटक

योगेश मोरे
Wednesday, 20 January 2021

त्याच रात्री पंचवटी पोलिस ठाण्यात विनोद आखाडे नामक व्यक्ती पत्नी बेपत्ता असल्याबाबत पोलिसांना सांगण्यासाठी आला. त्यावेळी विनोद यांनी पत्नीबाबत दिलेली माहिती ही पोलिसांना साम्य वाटले. त्यानंतर पोलिसांनी त्याला घेऊन घटनास्थळी गाठले व मृतदेह दाखविल्यानंतर पत्नी पूजाचा असल्याचे स्पष्ट केले. 

म्हसरूळ (नाशिक) : म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील पेठरोडवर असलेल्या पवार मळ्याच्या नाल्याजवळ धक्कादायक घटना घडली. अज्ञात संशयितांनी मोरेमळा परिसरात राहणाऱ्या विवाहितेचा धारधार शस्त्राने गळ्यावर वार करून निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

अशी आहे घटना

पूजा विनोद आखाडे (वय २३) असे मृत विवाहीतेचे नाव आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार (ता.१९) रात्रीच्या सुमाराला पेठरोड नामको रुग्णालयासमोर मखमलाबादला जाणाऱ्या रस्त्यावर पवार मळ्यानजिक नाल्याजवळ एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. याबाबत म्हसरूळ पोलिसांना एका इसमाने भ्रमणध्वनीहून माहिती कळविले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या सूचनेनुसार हवालदार संजय राऊत, सतीश वसावे, मंगेश दराडे आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी नाल्याजवळ २३ ते २५ वयोगटातील विवाहित महिला रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेली आढळून आली. सदर महिलेच्या गळ्यावर, कपाळावर तसेच पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. 

पोलिस स्टेशनला बेपत्ता असल्याची तक्रार

सदर महिलेची ओळख पटावी म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी अन्य पोलिस ठाण्यात कोणी महिला बेपत्ता झाल्याबाबत माहिती देण्यासाठी येते का याची माहिती कळविली. त्याच रात्री पंचवटी पोलिस ठाण्यात विनोद आखाडे नामक व्यक्ती पत्नी बेपत्ता असल्याबाबत पोलिसांना सांगण्यासाठी आला. त्यावेळी विनोद यांनी पत्नीबाबत दिलेली माहिती ही पोलिसांना साम्य वाटले. त्यानंतर पोलिसांनी त्याला घेऊन घटनास्थळी गाठले व मृतदेह दाखविल्यानंतर पत्नी पूजाचा असल्याचे स्पष्ट केले. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

मारेकरी रिक्षात आला असावा?

मोरे मळ्यात राहणारे पूजा व विनोद हे पती-पत्नी आहेत. विनोद याचा डिजेचा व्यवसाय आहे. पोलिसांनी विनोद याला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. तूर्तास पूजा हिचा मारेकरी कोण? कोणत्या कारणावरून खून केला? याचे कारण गुलदस्त्यात आहे. तर पूजा हिचा खून अनैतिक संबंधातून झाला असावा अशी शक्यता पोलिस सुत्रांनी वर्तविली आहे. मयत पूजा व मारेकरी हे रिक्षात बसून घटनास्थळी आले असावे व त्याठिकाणी वाद झाल्यावर त्या अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केला असावा असे पोलिसांनी सांगितले. तर घटनास्थळी रिक्षा चाकांचे मातीवर निशाण उठले असल्याने मारेकरी रिक्षात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: killed of a married woman by unknown assailants nashik marathi news