दुर्दैवी घटना! लॉकडाऊनमुळे पायीच निघाला गावी..पण कसारा घाटातच 'त्याला' द्यावी लागली श्रध्दांजली..

kasara ghat 1.jpg
kasara ghat 1.jpg

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सहा आठवड्यांपासून राज्यात "लॉकडाउन' सुरू आहे. यामुळे ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने परप्रांतीय मजूर अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमुळे हा परप्रांतिय मजूर भिवंडीवरुन पायीच गावी निघाला होता. पण त्यानंतर जे काही घडले ते अत्यंत दुर्दैवी होते.

अशी घडली घटना

लॉकडाऊनमुळे हा परप्रांतिय मजूर भिवंडीवरुन पायीच गावी निघाला होता. त्यांच्यासोबत अन्य तीन-चार सहकारी होते. मात्र कसारा घाटाच्या पायथ्याशी रस्त्यातच हार्टअटॅक आल्याने, एकाचा  दुर्दैवी मृत्यू झाला. शिवशरण मोतीलाल सोनी (55) असं या दुर्दैवी कामगाराचं नाव आहे. ते मध्यप्रदेशातील सिद्धी जिल्ह्यातील गरवली गावाकडे पायी निघाले होते. मात्र वाटेतच त्यांना हार्टअॅटकने गाठल्याने त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.

इगतपुरी येथील रुग्णालयात शवविच्छेदन

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचं पार्थिव इगतपुरी येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं. शविविच्छेदनानंतर पार्थिव सोबतच्या व्यक्तीकडे सोपवण्यात आलं. मात्र पार्थिव घेऊन ते कुठे गेले आणि त्यांना कुठे पाठवण्यात आले याची माहिती कसारा पोलिस देण्यात तयार नाहीत. त्याबाबत प्रशासनाकडूनही अद्याप माहिती मिळालेली नाही.

106 परप्रांतीयांची रवानगी आनंदवलीतील निवारा शेडमध्ये

लॉकडाउन'मुळे मुरबाडमध्ये (जि. ठाणे) अडकून असलेले मध्य प्रदेशातील शेकडो परप्रांतीय मजूर मुंबई- आग्रा महामार्गाने गुरुवारी (ता.23) मध्य प्रदेशच्या दिशेने निघाले होते. हे मजूर नाशिकमधील उड्डाणपुलावरून जात असताना मुंबई-नाका पोलिसांनी त्यांना अडवत 106 परप्रांतीयांची रवानगी आनंदवलीतील निवारा शेडमध्ये केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com