चमत्कारच! एकशे पंधरा वर्षांपासून तेवतोय ‘तो’ दगडी दिवा; पाटील कुटुंबाची परंपरा कायम

diva.jpg
diva.jpg

नाशिक : (इंदिरानगर) नवरात्रोत्सवात राज्यभर कुलस्वामिनीची आराधना करणाऱ्या भाविक आणि कुटुंबांतर्फे पिढ्यान् पिढ्या अनेक परंपरा जपल्या जातात. याच पद्धतीने मूळचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील बाह्मणे गावातील पाटील कुटुंबीयाने घटस्थापनेत तब्बल ११५ वर्षांपासून एकच दगडी दिवा वापरण्याची परंपरा जपली आहे. 


नवरात्रोत्सवात पाटील कुटुंबाची परंपरा कायम 

१९०५ ला (कै.) लक्ष्मीबाई पाटील यांनी एरंडोलच्या बाजारातून स्थानिक कारगिराकडून हा दिवा बनवून घेतला होता. काळ्याशार दगडात कोरीव काम करून झाकण आणि आवश्यक त्या जागा या दिव्यात करण्यात आल्या. चार किलो १०० ग्रॅमचा हा दिवा आजही त्याच स्थितीत आहे. विशेष म्हणजे त्याला रंगरंगोटीदेखील करण्याची कधी गरज भासली नाही. सामान आवरताना अनेकदा हा दिवा उंचावरूनही पडला. मात्र तो कुठेही फुटला नाही. १९४५ च्या सुमारास लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या सूनबाई म्हणजेच पुत्र आणि मविप्र संस्थेच्या सटाणा येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूलचे पहिले मुख्याध्यापक (कै.) मुकुंदराव पाटील यांच्या पत्नी (कै.) हंसाबाई यांच्याकडे हा दिवा सुपूर्द केला. त्यांनी नवरात्रातील उपवास आदी परंपरा सुरू ठेवल्या. 

दिव्याच्या साक्षीने आदिशक्तीची आराधना

सत्तरच्या दशकात हंसाबाई यांनी पुत्र आणि ‘मविप्र’ संस्थेचे माजी मुख्याध्यापक व्ही. एम. पाटील यांच्या पत्नी (कै.) मंगल यांना घरची सून म्हणून हा दिवा नवरात्रात सुपूर्द केला. त्यांनी ही परंपरा पुढे नेली. त्यांनी स्वतःच्या निधनापूर्वीच शहापूर येथील लिबर्टी ऑइल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणार मुलगा आमोद यांच्या पत्नी जयश्री यांच्याकडे ही परंपरा १५ वर्षांपूर्वी सोपवली. सौ. जयश्री या आजपर्यंत ही परंपरा जपत आहेत. पिढ्यान् पिढ्या पाटील कुटुंब या दिव्याच्या साक्षीने आदिशक्तीची आराधना करत आहेत. 

माझ्या सासूबाईंनी हा दिवा मला देताना सांगितलेली परंपरा ऐकूनच मी रोमांचित झाले होते. इतकी जुनी कौटुंबिक परंपरा भक्तिभावाने जपत असल्याचा मोठा अभिमान असून, मुलांनादेखील याचे मोठे अप्रूप आहे. - जयश्री पाटील  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com