बालपणीच्या दोस्तीला अंतराळाचे ध्येय; आर्यन-आदित्यचं होतंय सर्वत्र कौतुक

प्रमोद सावंत
Sunday, 24 January 2021

भारतात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात असून, महाराष्ट्रातून या विद्यार्थ्यांची टीम स्वतः उपग्रह बनविण्यासाठी सहा दिवसांचे ऑनलाइन प्रशिक्षण २ ते ७ जानेवारीदरम्यान मराठीतून देण्यात आले होते. या प्रकल्पामुळे अंतराळात शेती संशोधनात मदत होणार आहे. 

मालेगाव (नाशिक) : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांसाठी टेक्नॉलॉजीच्या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी बनविलेले शंभर उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करणार आहेत. हे उपग्रह बनविण्यासाठी येथील के. बी. एच. शाळेतील विद्यार्थी आदित्य जायखेडकर व नांदगाव न्यू इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थी आर्यन धोंडगे यांची निवड करण्यात आली आहे. ७ फेब्रुवारीला रामेश्‍वरम येथून हेलियम बलूनमार्फत पृथ्वीच्या समांतर कक्षेत हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष उपग्रह बनविण्यासाठीचे एकदिवसीय प्रशिक्षण १९ जानेवारीला पुणे येथे होणार आहे. 

अंतराळात शेती संशोधनात मदत होणार

बागलाण तालुक्यातील जायखेडा व टेंभे येथील हे विद्यार्थी भूमिपुत्र असून, मागील वर्षी विद्यालयाच्या प्रदर्शनात जिल्हास्तरावर या दोघे विद्यार्थ्यांची निवड झाली होती. दोघांचेही आई-वडील प्राथमिक शिक्षक असल्याने मार्गदर्शन लाभले. भारतात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात असून, महाराष्ट्रातून या विद्यार्थ्यांची टीम स्वतः उपग्रह बनविण्यासाठी सहा दिवसांचे ऑनलाइन प्रशिक्षण २ ते ७ जानेवारीदरम्यान मराठीतून देण्यात आले होते. या प्रकल्पामुळे अंतराळात शेती संशोधनात मदत होणार आहे. 

हेही वाचा >  ‘कोब्रा-घोणस’च्या लढाईचा थरार! मांजराने केली मध्यस्थी; पाहा VIDEO

दोघा मित्रांचे सर्व स्तरांतून कौतुक

कमी वजनाचे ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर बलूनद्वारे प्रस्थापित केले जाणार आहे. हे उपग्रह एका केसमध्ये फिट असतील. त्याला प्याराशूट जी. पी. एस. सिस्टिम लॉइव्ह कॅमेरा जोडलेला असेल. तेथून पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. पॅलोडसोबत काही झाडांची बिजे पाठवले जातील. ही संशोधनास मदत होणार आहे. या प्रकल्पाची गीनिज बुक ऑफ वर्ल्डरेकॉर्ड, आशिया विक्रम आणि इंडिया विक्रम यात नोंद होणार आहे. या दोघा मित्रांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, या प्रकल्पातून संशोधनाची आवड निर्माण होणार आहे.  

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To launch a satellite into space Involvement of two childhood friends nashik marathi news