
मोहन विठ्ठल लिंबोळे यांनी हरकत घेत, अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकत घेतली होती. मोहिनी जाधव एकलहरे ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आल्या असून, २०१७ पासून २०२२ पर्यंत सरपंचपदी त्यांची निवड झाली आहे.
नाशिक : एकलहरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहिनी संदीप जाधव यांना सरपंचपदासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडे झालेल्या तक्रारीच्या सुनावणीत हा निर्णय झाला.
अन् सुनबाई सरपंच पदासाठी अपात्र...
मोहिनी जाधव यांच्या कुटुंबाने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेले असल्याने त्यांना अपात्र ठरवावे यासाठी मोहन विठ्ठल लिंबोळे यांनी हरकत घेत, अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकत घेतली होती. मोहिनी जाधव एकलहरे ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आल्या असून, २०१७ पासून २०२२ पर्यंत सरपंचपदी त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या सासऱ्यांनी एकलहरे परिसरातील गोदावरी कालव्यावर अतिक्रमण करून वसविलेल्या सिद्धार्थनगर या येथे शासकीय जागेवर अतिक्रमण करून घर बांधले असून, त्यांच्या पतीचा याच जागेवर व्यवसाय आहे. त्यामुळे जाधव कुटुंबाचे शासकीय जागेवरील अतिक्रमण असल्याने त्यांना अपात्र ठरविण्याच्या मागणीसाठी लिंबोळे यांची तक्रार होती.
हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क
जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेला निकाल धक्कादायक आहे. गावातील भ्रष्ट रेशन दुकानावर कठोर कारवाईसाठी सतत पाठपुरावा केल्याने माझ्याविरुद्ध राजकीय षडयंत्र रचून खोटी तक्रार दाखल केली गेली. पाटबंधारे विभागाने अतिक्रमण नसल्याबाबतचा स्पष्ट अहवाल देऊनसुद्धा निकाल माझ्याविरोधात देऊन माझ्यावर अन्याय केला आहे. झालेल्या निर्णयाच्या विरोधात वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागणार आहे. - मोहिनी जाधव, सरपंच, एकलहरे
हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना