शेतकरी आंदोलनातील अग्रणी नेत्या काळाच्या पडद्याआड..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

ऊसाला हमी भाव मिळावा यासाठी निफाड तालुक्‍यातील बहुचर्चीत आणि​राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण देणाऱ्या आंदोलनात त्या सक्रीय होत्या. हे आंदोलन अनेक महिने धगधगत होते. त्यामुळे निफाड तालुक्‍यातील लहान- मोठ्या कार्यकर्त्यांची आस्थेने विचारपुस करणाऱ्या अन्‌ मदतीला धाऊन जाणाऱ्या गृहिनी म्हणून त्या सर्वपरिचीत होत्या.

नाशिक :  ऊसाला हमी भाव मिळावा यासाठी निफाड तालुक्‍यातील बहुचर्चीत आणि राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण देणाऱ्या आंदोलनात त्या सक्रीय होत्या. हे आंदोलन अनेक महिने धगधगत होते. त्यामुळे निफाड तालुक्‍यातील लहान- मोठ्या कार्यकर्त्यांची आस्थेने विचारपुस करणाऱ्या अन्‌ मदतीला धाऊन जाणाऱ्या गृहिणी म्हणून विमल मोगल उर्फ काकू सर्वपरिचीत होत्या. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पहिल्या आंदोलनातील नेत्या विमल मालोजीराव मोगल उर्फ काकू (वय 89) यांचे आज (ता.१५) निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

निफाडच्या धगधगत्या आंदोलनात काकूंचा सक्रिय सहभाग 

माजी आमदार तसेच सहकार क्षेत्रातील नेत (कै) मालोजीराव मोगल यांच्या त्या पत्नी होत्या त्यांच्या पश्‍चात कॉंग्रेस नेते राजेंद्र मोगल, सर्जेराव आणि प्रमोद मोगल हे तीन मुलगे व चार मुली आहेत. 1970 ते 1990 या दोन दशकांत सहकार व शेतीत राज्यात अग्रेसर असलेल्या निफाड तालुक्‍यातील राजकारणावर (कै) मालोजीराव मोगल यांचे वर्चस्व होते. तीन टर्म आमदार राहिलेल्या काकासाहेब मोगल यांच्या पश्‍चात त्यांच्या सर्व सामाजिक, उपक्रमांत त्या सक्रीय होत्या. राजकीय कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची वर्दळ त्यांच्या घरी सतत असे. त्यामुळे त्यांचे घर हे सार्वजनिक ठिकाण वाटावे अशी स्थिती होती. या सर्वांची आस्थेने विचारपुस करुन त्या सगळ्यांचे आदरातीथ्य करीत असल्याने काकु म्हणून त्या सर्व परिचीत होत्या. 1980 मध्ये (कै) शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा जन्म याच भागात होऊन ते सबंध महाराष्ट्रात पसरले होते. यावेळी कुंदेवाडी रेल्वे स्थानकावर मोठा रेल्वे रोको झाला होता. त्यात संतप्त शेतकऱ्यांनी रेल्वे स्थानक जाळून टाकले होते. यावेळी काकुंना पोलिसांनी अटक केली होती.

ह्रदयद्रावक -  VIDEO : ह्रदयद्रावक! पतंगामागे धावत होता चिमुकला...ऐन मकरसंक्रांतीलाच आक्रोश..

हेही वाचा > लॉटरी लागल्याचा आनंदच आनंद...अन् क्षणात दु:खाचा डोंगर...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leader of Nifad farmers movement Vimal Mogal died Nashik Marathi News