उद्योगांना किमान २० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करा; 'निमा'तर्फे उद्योगमंत्र्यांना साकडे

सतीश निकुंभ
Friday, 18 September 2020

पोलाद उद्योगातील उत्पादने बंद झाली असली तरी, त्यांच्या भट्ट्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी ऑक्सिजन पुरवठा व्हावा, यासाठी ‘निमा’ने उद्योगमंत्र्यांकडे औद्योगिक वापरासाठी किमान २० टक्के पुरवठा उद्योगाला झाला पाहिजे, अशी मागणी केली. ‘निमा’चे पदाधिकारी शशिकांत जाधव, तुषार चव्हाण, कैलास अहिरे उपस्थित होते.  

नाशिक : (सातपूर) कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने त्यांना १०० टक्के ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्योगांना किमान वीस टक्के ऑक्सिजन पुरवठा करावा, अशा मागणीचे निवेदन ‘निमा’तर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना देण्यात आले. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

महिनाभरापासून कोरोना रुग्णांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या रुग्णांना ऑक्सिजन मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योगांना शंभर टक्के ऑक्सिजनचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील पोलाद उद्योगासह अभियांत्रिकी व वेल्डिंग शॉपमधील सर्व उत्पादने बंद आहेत. यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. पोलाद उद्योगातील उत्पादने बंद झाली असली तरी, त्यांच्या भट्ट्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी ऑक्सिजन पुरवठा व्हावा, यासाठी ‘निमा’ने उद्योगमंत्र्यांकडे औद्योगिक वापरासाठी किमान २० टक्के पुरवठा उद्योगाला झाला पाहिजे, अशी मागणी केली. ‘निमा’चे पदाधिकारी शशिकांत जाधव, तुषार चव्हाण, कैलास अहिरे उपस्थित होते.  

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At least 20 per cent to industries Supply oxygen nashik marathi news