
दहेगाव (ता. दिंडोरी) शिवारात राहणाऱ्या एका पाच वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. संचित मेधने असे जखमी बालकाचे नाव असून जखमी संचितवर नाशिकमधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दहेगाव परिसरात बिबट्याने बालकावर केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
नाशिक/लखमापूर : दहेगाव (ता. दिंडोरी) शिवारात राहणाऱ्या एका पाच वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. संचित मेधने असे जखमी बालकाचे नाव असून जखमी संचितवर नाशिकमधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दहेगाव परिसरात बिबट्याने बालकावर केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
अशी घडली घटना
शनिवारी (ता.11) दुपारी तीनला संचित आजीसोबत शेत रस्त्याने जात असतांना रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतामध्ये दडून बसलेल्या बिबट्याने संचितवर झडप मारली. यावेळी आजीने आरडाओरड करताच आजूबाजूचे लोक पळत आल्याने बिबट्याने पळ काढला. त्यानंतर जखमी संचित यास उपचाराकरीता तत्काळ दिंडोरीला नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचाराकरीता त्यास नाशिकला हलविण्यात आले. दहेगाव, वागळुद, लखमापूर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत आहे.
हेही वाचा > ‘आम्ही पोलिस आहोत’ असा विश्वास दाखवला..अन् निवृत्त एसटी कर्मचाऱ्यासोबत केले असे..
बिबट्याने बालकावर केलेल्या हल्लामुळे परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. यापूर्वी देखील बिबट्याने कुत्रे, वासरू, जनावरे यांच्यावर हल्ला केलेला आहे. त्यामुळे या भागात पिंजरा बसविण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
हेही वाचा > खून झालेल्या युवकावर बलात्काराचा गुन्हा..? युवती गर्भवती राहिल्याने झाला खुलासा