इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडीत बिबट्याचा वृद्धावर हल्ला

पोपट गवांदे
Sunday, 11 October 2020

मागील दोन महीन्यापुर्वी 15 आगस्टच्या दरम्यान याच भागातील नांदगांवसदो येथे एका घरात चार पिल्लाच्या बिबट्या मादीने पिल्लासह दहा ते बारा दिवस आश्रय घेतल्याने दहशत पसरली होती.

नाशिक/इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या कुरुंगवाडी येथे पहाटे 4 वाजेच्या सुमारास बिबट्याने एका वृद्धावर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर घोटी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती खैरगाव येथील वनपाल भाऊसाहेब राव यांनी दिली. 

पडवीत झोपलेले असताना

या बाबत वनविभागाने दिलेल्या माहिती नुसार कुरूंगवाडी येथील कानु चिमा धुपारे, वय 75 वर्ष, हे राहात आहेत. रविवार ( ता. 11 रोजी ) कानु चिमा धुपारे हे झोपडीच्या पडवीत झोपलेले असताना पहाटे 4 वाजेच्या सुमारास अचानक बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. घटना घडलेल्या भागात वाहन नसल्याने संबंधित वृद्ध व्यक्तीस कुरुंगवाडीपासुन अर्धा कि. मी. पिंप्रीसदो ते वासळी रस्त्यापर्यंत झोळी करून नेण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली खैरगाव वनपाल भाऊसाहेब राव, वनरक्षक नरेश नावकर, प्रियंका साबळे, सोमनाथ जाधव, रुपाली गायकवाड, चिंतामण गाडर, एफ. जी. सैयद, मुजावर शेख आदी घटनास्थळी उपस्थित आहेत. 

हेही वाचा > अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

मागील दोन महीन्यापुर्वी 15 आगस्टच्या दरम्यान याच भागातील नांदगांवसदो येथे एका घरात चार पिल्लाच्या बिबट्या मादीने पिल्लासह दहा ते बारा दिवस आश्रय घेतल्याने दहशत पसरली होती. या मादीनेच या वृध्दावर हल्ला केला काय याचा शोध खैरगांव येथील वनपाल भाऊसाहेब राव यांच्या टीमकडुन घेतला जात आहे.

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard attacks the old man nashik marathi news