बिबट्याचा संचार तर झाला...! पण तो आहे कुठे?.. चर्चांना उधाण

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 1 जून 2020

कॉलेज रोड, तिडके कॉलनी, राजसारथी सोसायटीनंतर जुने नाशिक आणि सारडा सर्कल या भागात बिबट्याचा संचार असल्याचे वृत्त रविवारी (ता. 31) पसरले. त्यामुळे चौकमंडई परिसरात नागरिकांनी गर्दी केली. भद्रकाली पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानी कब्रस्तानमध्ये जाऊन तसेच परिसरात काही पायाचे ठसे सापडतात का, याची पाहणी केली.

नाशिक : कॉलेज रोड, तिडके कॉलनी, राजसारथी सोसायटीनंतर जुने नाशिक आणि सारडा सर्कल या भागात बिबट्याचा संचार असल्याचे वृत्त रविवारी (ता. 31) पसरले. त्यामुळे चौकमंडई परिसरात नागरिकांनी गर्दी केली. भद्रकाली पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानी कब्रस्तानमध्ये जाऊन तसेच परिसरात काही पायाचे ठसे सापडतात का, याची पाहणीही केली. पण बिबट्या कुठेच सापडेना

पुरावे मिळाले नसल्याने केवळ चर्चाच

नाशिक येथील चौकमंडई भागातील जहॉंगीर कब्रस्तान आणि सारडा सर्कल खतीब कब्रस्तान परिसरात बिबट्या आल्याची माहिती मिळाल्याने भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्याबाबत माहिती घेतली. परंतु या ठिकाणी बिबट्या आला असल्याचे कुठलेही पुरावे मिळाले नसल्याने ही केवळ चर्चाच ठरली. 

हेही वाचा > कोरोनापेक्षा बदनामीच्या विषाणूशी 'तो' वेदनादायक संघर्ष...पण, आम्ही लढलोच!

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कॉलेज रोड, तिडके कॉलनी, राजसारथी सोसायटीनंतर जुने नाशिक आणि सारडा सर्कल या भागात बिबट्याचा संचार असल्याचे वृत्त रविवारी (ता. 31) पसरले. त्यामुळे चौकमंडई परिसरात नागरिकांनी गर्दी केली. भद्रकाली पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानी कब्रस्तानमध्ये जाऊन तसेच परिसरात काही पायाचे ठसे सापडतात का, याची पाहणी केली. मात्र या ठिकाणी बिबट्या असल्याच्या कुठल्याही खुणा आढळल्या नाहीत. दरम्यान, येथून बिबट्या सारडा सर्कल भागातील खतीब कब्रस्तानमध्ये गेल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्याठिकाणी कुणीही बिबट्यास पाहिले नाही. शहरी भागात बिबट्याचा संचार वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

हेही वाचा > 'मी नाही, माझ्यातल्या खेळाडूने केले कोरोनाला क्लिन बोल्ड!'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard came Discussions abound on Sunday nashik marathi news