अखेर कळवाडीत वन विभागाकडून बिबट्या जेरबंद

leopard captured in kalwadi nashik marathi news
leopard captured in kalwadi nashik marathi news
Updated on

नाशिक/कळवाडी :  परिसरातगेल्या महिनापासुन बिबट्या सदृश वन्यप्राण्याचा वावर असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे शेतकरी दहशतीखाली जगत होते, त्यानुसार सदर परिसरात गस्त वाढवून वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता. या दरम्यान शेत शिवारात बुधवारी (ता.9) पहाटेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या सापळ्यात बिबट्या पकडून जेरबंद करण्यात आला आहे.

 काही दिवसांपुर्वी चार शेळ्या व दोन मेंढ्या वन्यप्रान्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती. तसेच या परिसरात वन्यप्रान्याकडून पाळीव जनावरे ठार केल्याच्या सहा सात घटना घडल्याने शेतकरी व नागरीकांचा रोष वाढला होता. याची दखल घेत वनाधिकारी व वन कर्मचारी यांनी या परिसरात दिवस रात्री गस्त वाढवण्यात अली होती. अखेर वनविभागाच्या प्रयत्नांना यश आले आहे.

वनविभागाने लावलेल्या पिंज-यात जेरबंद करून बिबट्याला सुरक्षितेसाठी लोणावडे वनपर्यटन स्थळी ठेवण्यात आले आहे. सदर बिबटया अंदाजे चार ते पाच वर्षे वयाचा असून नर आहे. उप विभागीय वन अधिकारी जगदीश येडलावार यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विलास कांबळे, वनपाल श्री भडांगे, देवरे, वनरक्षक सागर पाटील संदीप येळवे, योगेश पाटील व वनमजूर यांनी यशस्वी केली. 

संपादन - रोहित कणसे

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

former mla Sanjay Chavan Urges CM Devendra Fadnavis
Police Probe Alleged Abduction and Sexual Assault After Jewellery Purchase Pretext
NCP workers staged a symbolic tree plantation protest over potholes on the Sakri Shirdi National Highway, demanding immediate road repairs.
NCP (Sharad Pawar) workers staged a sit-in protest at the Mahavitaran office in Satana against the installation of smart meters without consumers' consent.
Marathi News Esakal
www.esakal.com