esakal | पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्का
sakal

बोलून बातमी शोधा

bortembhe.jpg

पहाटेची वेळ...डोंगरावर जनावरे चरण्यासाठी गुराखी गेले; मात्र पाऊस व दाट धुके असल्याने जवळच्या एका मंदिराच्या आश्रयाला थांबले असता, त्या भागात दुर्गंधी येत असल्याने त्यांनी दुर्गंधी येत असलेल्या भागाकडे जाऊन पाहिले असता धक्काच...असं काय दिसलं त्यांना? वाचा सविस्तर

पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्का

sakal_logo
By
पोपट गवांदे

नाशिक : (इगतपुरी शहर) पहाटेची वेळ...डोंगरावर जनावरे चरण्यासाठी गुराखी गेले; मात्र पाऊस व दाट धुके असल्याने जवळच्या एका मंदिराच्या आश्रयाला थांबले असता, त्या भागात दुर्गंधी येत असल्याने त्यांनी दुर्गंधी येत असलेल्या भागाकडे जाऊन पाहिले असता धक्काच...असं काय दिसलं त्यांना? वाचा सविस्तर

असा आहे प्रकार 

बोरटेंभे शिवारातील हॉटेल गोल्डनसमोरील रविवार (ता. २३) टेकडीवर रोजच्या प्रमाणे पहाटे डोंगरावर जनावरे चरण्यासाठी गुराखी गेले; मात्र पाऊस व दाट धुके असल्याने जवळच्या एका मंदिराच्या आश्रयाला थांबले असता, त्या भागात दुर्गंधी येत असल्याने त्यांनी दुर्गंधी येत असलेल्या भागाकडे जाऊन पाहिले असता तेथे सडलेल्या व भिजलेल्या अवस्थेत मृत बिबट्या दिसल्याचे गुराखींनी वन विभागाला सांगितले. माहिती मिळताच वन विभाग अधिकारी व पथकाने मृत बिबट्याला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेऊन त्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर अज्ञातस्थळी बिबट्याचे शव जाळून अंत्यविधी करण्यात आला. महिन्याभरापासून इगतपुरीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, या पावसाचा परिणाम वन्यजीव प्राण्यांवरही झाल्याने बिबटे निवाऱ्याच्या शोधात शहरालगत येऊ लागले आहेत. 

हेही वाचा > अचानक सायरनचा तो धडकी भरविणारा आवाज..नागरिकांत घबराट अन् सुटकेचा निश्वास! काय घडले नेमके?

आठ दिवसांपूर्वीच पावसामुळे बछड्यांचे संरक्षण करण्यासाठी एका बिबट्या मादीने चार बछड्यांसह एका पडीत घरात आश्रय घेतला आहे. त्यापाठोपाठ आज पावसामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश डोमसे, वनपाल अधिकारी पोपटराव डांगे, वनरक्षक के. के. हिरे, एम. बी. धादवड, वाहनचालक मुजाफर शेख सय्यद, पी. एन. वळकंदे उपस्थित होते.  

हेही वाचा > शिवप्रेमींत हळहळ; शिवप्रेमी रितेशची किल्ल्यावरील 'ती' सेल्फी शेवटची ठरली, काय घडले?

संपादन - किशोरी वाघ


 

go to top